Kitchen Tips: या सोप्या टिप्स वापरा आणि घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवा

या सोप्या टीप्स वापरा आणि मसाल्यांना सुरक्षित आणि जास्त काळासाठी चांगलं ठेवू शकता. 

Updated: Aug 23, 2021, 10:49 PM IST
Kitchen Tips: या सोप्या टिप्स वापरा आणि घरातील मसाले खराब होण्यापासून वाचवा title=

मुंबई: पावसाळा म्हटलं की अनेक कटकटी अगदी कपडे न वाळण्यापासून ते स्वयंपाकघरातील मसाले ओले किंवा खराब होण्यापर्यंत अनेक समस्या असतात. पावसाळ्यात जास्त मसाले किंवा मीठ साखर खराब होणं किंवा त्याला पाणी सुटण्याचं प्रमाण वाढतं. बऱ्याचदा साखर आणि मीठाला पाणी सुटल्याने ते खराब होतात. मसाल्यामध्ये छोटे किडे होतात किंवा त्यावर बुरशी लागते. अशा सगळ्या समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तुम्ही या सोप्या टीप्स वापरा आणि मसाल्यांना सुरक्षित आणि जास्त काळासाठी चांगलं ठेवू शकता. 

मीठ किंवा साखर आणि त्यासोबत मसालेही तुम्ही काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता. त्यामध्ये सुद्धा काचेचा डबा हा कायम एअर टाइट असणं गरजेचं आहे. प्लास्टिकमध्ये लवकर मीठाला पाणी सुटू शकतं त्यामुळे चीनी मातीचं भाडं किंवा काचेचं भांड वापरणं केव्हाही उत्तम पर्याय आहे. 

मीठ-साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये तुम्ही ठेवू शकता. याचा दुसरा असा फायदा आहे की लवंग ठेवल्यानं साखरेला मुंग्या लागत नाहीत. तर मसाल्यांसाठी बिब्बा वापरू शकता. बुब्यामुळे मसाल्यामध्ये प्राणी होत नाहीत. किंवा बुरशी लागण्याचं प्रमाण कमी करता येऊ शकतं. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक घरात मसाले असू द्या किंवा मीठ-साखर यांना कधीही ओले हात लावू नका. त्यामध्ये ओला चमचा वापरू नका. त्यासाठी वेगळा चमचा ठेवा. चमचा किंवा हात ओले असतील तर त्यामुळे देखील बुरशी पकडण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शक्यतो ही काळजी घ्या. 

तांदळाचे दाणे हे मॉइश्चर शोषून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्ही जेव्हा डब्यात साखर किंवा मीठ भरत असाल तेव्हा तळाला आधी तांदुळाचं एक छोटं पुडकं बांधून डब्यात ठेवा. त्यामुळे दमटपणा नाहीसा होईल आणि पाणी सुटणार नाही. याशिवाय तुम्ही एअऱटाइट कंटेनर किंवा डब्यांचा वापर केलात तरीही उत्तम पर्याय आहे.