कॅलरी बर्न करण्यासाठी Cycling की Running? कोणती एक्सरसाईज फायदेशीर?

सायकल चालवणं आणि रनिंग म्हणजेच धावणे हे दोन्ही हार्ड कोर कार्डिओ व्यायाम आहेत, पण कोणता सर्वोत्तम कोणता हे पाहूया.

Updated: Jul 6, 2022, 07:11 AM IST
कॅलरी बर्न करण्यासाठी Cycling की Running? कोणती एक्सरसाईज फायदेशीर? title=

मुंबई : केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी आणि इतर सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. कोणताही व्यायाम रोज 45 मिनिटांसाठी केला पाहिजे. सायकल चालवणं आणि रनिंग म्हणजेच धावणे हे दोन्ही हार्ड कोर कार्डिओ व्यायाम आहेत, पण कोणता सर्वोत्तम कोणता हे पाहूया.

सायकलिंग VS रनिंग

सायकलिंग आणि रनिंग या दोन्हीमुळे शरीराला समान फायदा मिळतो. धावण्याने सायकलिंगच्या तुलनेत प्रत्येक मिनिटाला कॅलरी बर्न होते. मात्र धावणं हे प्रत्येकाला शक्य आहे असं नाही. अनेकदा धावल्याने हाडांवर आणि स्नायूंवर ताण येतो परिणामी दुखापत होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सायकलिंग प्रॅक्टिकली आणि फिजीकली आधाराने पाहिलं सायकलिंग करणं प्रत्येकाला फायदेशीर आहे.

कशात कॅलरी बर्न अधिक होते?

जर तुम्ही निरोगी राहण्यासाठी व्यायाम करत असाल तर तुम्ही सायकलिंग किंवा रनिंग करू शकता. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल, तर धावणं तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कमी वेळेत जास्त कॅलरी बर्न करण्याच्या बाबतीत, सायकल चालवण्यापेक्षा धावणं कधीही उत्तम.

अर्धा तास सायकल चालवल्याने 300 ते 350 कॅलरीज बर्न होतात, तर धावण्याने 400 ते 500 कॅलरीज बर्न होतात, पण जर तुम्ही वेगाने सायकल चालवत असाल तर कॅलरी बर्नही तेवढ्याच होतात. कॅलरीज बर्न करणं तुमच्या व्यायामाचा वेग, वेळेवर अवलंबून असतं.