ऋजुता दिवेकरने शेअर केला Detox Mantras

How To Keep Stay Fit And Healthy: तन आणि मन डिटॉक्स करणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने सांगते Detox Mantras  

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Nov 22, 2023, 04:46 PM IST
ऋजुता दिवेकरने शेअर केला Detox Mantras  title=

Detox Tips From Rujuta Diwekar : टॉक्सिन या शब्दाचा अर्थ प्रदूषक, कृत्रिम रसायने, जड धातू आणि प्रक्रिया केलेले पदार्थ असा होतो, ज्यांचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या विषारी द्रव्यांपासून शरीराला डिटॉक्स करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत, परंतु तुम्ही ही विषारी द्रव्ये शरीरातून काढून टाकण्यासाठी नैसर्गिक पद्धतीही वापरून पाहू शकता. सणानंतर शरीराला डिटॉक्स करणे खूप गरजेचे असते. दसरा, करवा चौथ, दिवाळी आणि भाऊ दूज या सणांमध्ये आम्ही सर्वांनी भरपूर खाल्लं, प्यायचो. अशा परिस्थितीत शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही महत्त्वाचे डिटॉक्स मंत्र दिले आहेत. रुजुता दिवेकर अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हेल्थ टिप्स शेअर करत असते. नुकताच न्यूट्रिशनिस्टने डिटॉक्स मंत्र शेअर केला आहे. रुजुता दिवेकरचे हे डिटॉक्स मंत्र कोणते आहेत ते जाणून घेऊया.

पहिला मंत्र

व्यायाम करण्यात काहीही नुकसान नाही आणि सर्वोत्तम व्यायाम हा आहे जो तुम्ही करू शकता. तसेच व्यायाम करण्यासाठी कोणताही शुभ मुहूर्त नसतो तुम्ही ज्या दिवसापासून व्यायाम कराल तोच दिवस चांगला. कारण तुम्ही व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. 

ऋजुता दिवेकर Detox Tips

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

दुसरा मंत्र

घरचे अन्न हे सर्वात पौष्टिक असते, असे ऋजुताचे मत आहे. त्यामुळे कमी ऑर्डर करा आणि घरी जास्त शिजवा. कारण घरचा आहार तुम्हाला पौष्टिक गोष्टी देतं. पण बाहेरील पदार्थ कमी दर्जाचे असण्याची दाट शक्यता असते. 

तिसरा मंत्र

हॅशटॅग प्रमोशनसाठी चांगले आहेत, आरोग्यासाठी नाही. आपल्याला निरोगी राहायचे असेल तर सोशल मीडिया किंवा मोबाईलचे व्यसन चांगले नाही, असे ऋजुताचे मत आहे. शारीरिक डिटॉक्स प्रमाणेच सोशल मीडिया डिटॉक्सही तितकेच महत्त्वाचे आहे. 

चौथा मंत्र

लवकर झोपायला जा. स्क्रीन म्हणजेच मोबाईल किंवा लॅपटॉप तुमच्यापासून दूर ठेवा. वेळेवर उठा आणि दिवसाची सुरुवात करा. कारण उत्तम आरोग्य राखण्यासाठी तुमची झोप अत्यंत गरजेची आहे.