भात आणि मांसाहारामुळे डायबिटीजचा धोका? मांसाहारामुळे वाढते रक्तातील साखर?

सध्या असा दावा करण्यात येतोय की, डायबिटीज रुग्णांसाठी भात आणि मांसाहार खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या दाव्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Updated: Apr 27, 2023, 10:44 PM IST
भात आणि मांसाहारामुळे डायबिटीजचा धोका? मांसाहारामुळे वाढते रक्तातील साखर? title=

सध्या असा दावा करण्यात येतोय की, डायबिटीज रुग्णांसाठी भात आणि मांसाहार खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या दाव्यामुळे डायबिटीज रुग्णांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डायबिटीजचे रुग्ण प्रत्येक घरात आढळतात. त्यामुळे या दाव्याची पडताळणी करून सत्यता सांगणं गरजेचं आहे.

या व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय ते पाहुयात- 

1990 ते 2020 सालापासून केलेल्या संशोधनानुसार, डायबिटीज झालेल्या रुग्णांमध्ये आहारातले बदल आढळून आले. प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने डायबिटीजचा धोका वाढू लागलाय. जगभरात 60 कोटींपेक्षा अधिक लोकांना डायबिटीज आहे. आहारातील बदलांमुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे लठ्ठपणा वाढून डायबिटीज वाढतं.

पडताळीतून काय सत्य समोर आलं

  • जीवनशैली आणि आहारातल्या बदलांमुळे डायबिटीजचा धोका
  • फायबर नसलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने डायबिटीज होऊ शकतो
  • प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमुळे लठ्ठपणा येतो आणि डायबिटीज होतो 
  • डायबिटीज रुग्णांनी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणं टाळावं

त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण आमच्या पडताळणीत प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो हा दावा सत्य ठरलाय.

रक्तातील साखरेची पातळी वाढली की लक्षणं दिसून येतात

पायांत वेदना

मधुमेहाचे बळी असाल तर तुम्हाला डायबेटिक न्यूरोपॅथी असू शकते. यामध्ये नसा खराब होतात ज्यामुळे पाय सुजतात, कधी कधी पाय सुन्न होतात.

त्वचा कठोर होणं

या स्थितीमध्ये तुमच्या पायाची आणि तळव्यांची त्वचा कडक होऊ लागते. योग्य चपला शूज परिधान केल्याने देखील हे होऊ शकते. अशावेळी रक्तातील साखरेची चाचणी  (Blood Sugar Test) करुन घ्या.

नखांच्या रंगामध्ये बदल

अशावेळी पायाच्या नखांचा रंग बदलतो. नखांचा रंग हा साधारणपणे गुलाबी असतो. मात्र यामध्ये नखं अचानक काळी दिसू लागतात. हे बदल हलक्यात घेऊ नका.