मुंबई : शरीराच्या उत्तम स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. दररोज पुरेशी झोप न घेतल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचे यूएसएमध्ये केल्या गेलेल्या संशोधनातून सांगण्यात आलं आहे. तसंच शरीरातील चरबी वाढण्याचीही शक्यता असते.
तर, पुरेशी झोप घेतल्यास रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. डायबिटीज-२ आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
'जर्नल ऑफ लिपिड रिसर्च'मध्ये प्रकाशित केल्या गेलेल्या अध्ययननुसार, ५ तासांची झोपही शरीराला नुकसान पोहचवू शकते. कमी झोप पोस्टपेंडियल लिप्मिया (postprandial lipidemia) किंवा ट्रायग्लिसराइडला (Triglyceride )प्रभावित करते.
'पेन स्टेट' युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ओरफू बक्सटन यांनी सांगितले की, कामातून येणाऱ्या तणावाचा केवळ झोपेवर परिणाम होत नाही तर कमी झोप आपल्या कामाला अधिक तणावपूर्ण करते.
'बॉल स्टेट' यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी, अमेरिकेत एक तृतियांश काम करणारे सात किंवा त्याहून कमी तास झोप घेतल्याने अशा लोकांची कार्यक्षमता वर्षागणिक कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वास्थ्य विज्ञानचे प्रोफेसर जगदीश खुबचंदानी यांच्या टीमने २०१० ते २०१८ पर्यंत १ लाख ५० हजार काम करणाऱ्या अमेरिकी लोकांवर संशोधन केलं. या संशोधनात २०१० मध्ये जवळपास ३१ टक्के लोकांना पुरेशी झोप मिळत नव्हती. पण पुढील ८ वर्षांत हा आकडा वाढून ३६ टक्क्यांवर पोहचला. महिला आणि पुरुषांसाठी संशोधनाचे निकाल समान होते.
डॉ. खुबचंदानी यांनी या शोधादरम्यान सांगितलं की, यूएसमध्ये सर्वच वयोगटातील लोकांमध्ये आजारांचा धोका वाढत असल्याने हे एक महत्त्वपूर्ण संशोधन ठरत आहे. ज्यात झोपेची समस्या प्रमुख आहे.
डॉ. खुबचंदानी यांनी सांगितले की, ७ तासांहून कमी झोप केवळ शारीरिक आणि मानसिक नुकसान करत नाही तर प्रजनन क्षमता, वेळेआधी मृत्यूचे कारण ठरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.