HOMECARE FOR DARK CIRCLES: बदलती जीवनशैली,हवामान ,प्रदूषण कामाचा टॅन तणाव या सर्वांचा वाईट परिणाम हा आपल्या शरीरावर होत असतो चेहऱ्यावर हा परिणाम खूप लवकर दिसू लागतो... त्यामुळे निस्तेज चेहरा पिंपल्स सारख्या समस्या उदभवतात त्याचसोबत डोळ्यांखाली काली वर्तुळ म्हणजेच डार्क सर्कल्स हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. बऱ्याचदा मेकअप करून ते लपण्याच्या प्रयत्न आपण करतो मात्र यावर कायमचा उपाय कारण खूप गरजेचं आहे
चला जाणून घेऊया काही घरगुती उपाय ज्यामुळे डार्क सर्कल्सवर आपण मात करू शकू.
दूध आपल्या घरात तर सहज उपलब्ध असत.थंड दूध डार्क सर्कल्सना दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे .कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून तो डोळ्यांखाली काही वेळासाठी ठेऊन द्या हा उपाय तुम्ही दिवस आणि रात्री करू शकता..काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवू लागेल
गुलाब पाणी तर सौन्दर्यासाठी खूप फायद्याचं आहे. डोळ्यांखाली गुलाबपाण्याचा बोळा आणि अर्धा तास तसाच ठेवून द्या याने डार्क सर्कल्सपासून त्वरित आराम मिळेल
मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळून हि पेस्ट तयार करावी त्यांनतर चेहरा डोळे स्वच्छ धुवून त्यावर हि पेस्ट अप्लाय करावी वीस मिनिट ठेवून त्यांनतर चेहरा आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत
हा नियम जर आपण रोज फॉलो केला तर डार्क सर्कल्समध्ये फरक तर पडेलच शिवाय आपली दृष्टी देखील सुधारेल