Relationship Tips: प्रेम हे आंधळ असतं असं कायम येतं. अनेकदा काही उदाहरण अशी असतात की त्यांना दुर्लक्षित करणे कठीण असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर तुम्ही जीवापाड प्रेम करता आणि काही वेळाने तुम्हाला कळते की त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नसून कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे, तेव्हा जास्त वाईट वाटते. आपल्याला असे किस्से जागोजागी ऐकायला मिळतात. (Relationship Tips Is Your Partner Cheating On You recognize that nz)
आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करत असतो तेव्हा त्याच्यासोबत आपला महत्त्वाचा वेळ घालवत असतो. आपण एक प्रकारची गुंतवणूक करत असतो. अशात तुम्हाला कुणी चिट करतंय का असा जर तुम्हाला संशय असेल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची. कारण, अशा परिस्थितीत तुमचा पार्टनर खरंच चीटिंग करतोय का हे कसं समजेल? याबाबतच्या काही खास टिप्स.
1. जर तुम्हाला पक्क माहित असेल की तुमचा पार्टनर हा तुम्हाला धोका देतोय तर त्याला याची लाज वाटेल असं वातावरण तयार करा. त्याला समजू द्या की तो चिट करतोय हे तुम्हाला माहित आहे. याने लाजून का होईना तो त्याची चूक कबूल करेल.
2. तुमचा पार्टनर खरं बोलत नसेल तर त्याला तुम्ही एकमेकांसोबत घालवलेल्या गोड क्षणांची आठवण करून द्या. त्याला प्रेमाचे व तुमच्या नात्याचे महत्त्व पटवून द्या. अशाने एक न एक दिवस त्याने केलेली चूक आठवेल आणि तुमच्यासमोर कदाचित खरं बोलेल.
3. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी बोलायला तयार होईल तेव्हा कोणत्याही प्रकारचे प्रश्न न विचारता किंवा त्याच्या संवादात अडथळा निर्माण न करता त्याचे शांतपणे ऐकून घ्या.
4. तुम्ही त्याच्यासोबत ट्रुथ ऑर डेअर हा गेम खेळा. तो खेळ खेळताना असे प्रश्न विचारा की त्याला गिल्ट होईल. त्याच्याकडून एक चूक झालेली आहे हे इमोशनली त्याला आठवण करुन द्या. अशाने तो तुमच्यासमोर खरं बोलेल.
5. जर तुम्ही रागाच्या भरात मोठ्या आवाजात त्याच्याशी बोललात तर कदाचित तुमचा पार्टनर खरं सांगणार नाही. त्यामागे दोन कारणे असू शकतात. एकतर त्याचा इगो आणि दुसरं म्हणजे भीती. त्यामुळे त्याच्याकडून कोणत्याही प्रकारची कबूली घेताना सावकाश आणि शांत डोकं ठेवून बोला.
रिलेशनशीपमध्ये चीट करण्याचे अनेक प्रकार समोर येताना पाहायला मिळतात. हल्लीच्या फास्ट जगात जेवढ्या लवकर कपल्स जवळ येतात तेवढ्याच लवकर त्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. त्यामुळे तुम्हीही कोणाच्या प्रेमात असाल तर विचारपूर्वक पावलं उचला.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)