Refrigerator Hacks: चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 3 गोष्टी नाही तर...

Refrigerator Hacks: फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं तुमच्या आरोग्याला होऊ शकते हानी... तुम्हाला माहितीये का...

Updated: Feb 19, 2023, 07:02 PM IST
Refrigerator Hacks: चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 3 गोष्टी नाही तर... title=

Refrigerator Hacks : आपल्या प्रत्येकाच्या फ्रीज हे आहेच... फक्त शहरात नाही तर आज गावातसुद्धा प्रत्येकाच्या घरात आपल्याला फ्रीज हे दिसतच. मात्र, फ्रीजचा सगळ्यात जास्त उपयोग कधी होतो? तर त्याचं योग्य उत्तर आहे उन्हाळ्यात... कारण उन्हाळ्यात गार पाणी, बर्फ आणि सरबतासाठी आपण फ्रीजचा वापर करतो. फक्त इतकंच नाही तर आपण बऱ्याचगोष्टी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो. जेणेकरून ते जास्त काळ टिकतील... पण तुम्हाला माहितीये का काही गोष्टी जर आपण फ्रीजमध्ये ठेवल्या तर त्यानं आपल्या आरोग्याला हानी होऊ शकते. 

फ्रीजमध्ये ठेवलेल्या काही गोष्टींचे सेवन केल्यानं आपल्याला आरोग्या संबंधीत समस्या उद्भवू शकतात. कारण काही गोष्टी या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यांची चव आणि क्वॉलिटी खराब होते. त्यामुळे अशा काही पदार्थांचे सेवन करणे हानिकार असू शकते. चला तर आज आपण जाणून घेऊया फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला नको... आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं आपल्या शरीराला हानी होती. 

हेही वाचा : Shahid Kapoor's Farzi Girlfriend : कोण आहे Shahid Kapoor ची 'फर्जी' गर्लफ्रेंड, फोटोमुळे सोशल मीडियावर तिचीच चर्चा

बटाटे (Potato)
अनेकदा आपण भाज्या खराब होऊ नये म्हणून त्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कारण बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यात असलेल्या स्टार्चचे रुपांतर साखरते होते. जे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. फ्रीजमध्ये ठेवलेले बटाटे हानिकारक असू शकतात, विशेषत: ज्या लोकांना मधुमेह आहे... त्या लोकांसाठी.

केळ (Banana) 
केळ चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका, हे अनेकांना माहीत आहे. कारण फ्रीजमध्ये केळ ठेवल्याने ते लवकर खराब होते आणि त्याचा रंगही काळा होतो. खराब केळ्याचे सेवन केल्यानं आपल्या आरोग्याला हानि होऊ शकते. याच कारणामुळे केळ फ्रीजमध्ये ठेवू नका. 

मध (Honey) 
तुम्हाला माहित आहे का मध फ्रीजमध्ये कधीच ठेवायला नको. फ्रिजमध्ये मध ठेवल्याने त्याची नैसर्गिक चव खराब होते आणि कमी तापमानात मधाल ठेवलं तर मधात क्रिस्टल्स तयार होतात. म्हणूनच मध फ्रीजमध्ये ठेवू नये, नेहमी रुम टेम्परेचरवर ठेवा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)