या कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !

 व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

Updated: Nov 17, 2018, 12:32 AM IST
या कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !   title=

मुंबई : व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

कदाचित तुम्ही पुरेसा व्यायाम करीत नाही अथवा तुम्ही अति साखरेचे ,अति तेलकट पदार्थ खात आहात किंवा तुम्ही योग्य आहार घेत नाही किंवा अगदी हे तुमच्या पालकांकडून तुम्हाला मिळालेले आनुवंशिक लक्षण देखील असू शकते.ही सर्व कारणे जरी खरी असली तरी काही विकार व आरोग्य स्थितीमध्ये देखील तुमच्या पोटाचा घेर वाढू शकतो व असे असल्यास तुम्ही फक्त व्यायाम करुन अथवा योग्य आहार घेऊन तो कमी होत नाही.यासाठी जाणून घ्या कोणत्या विकारांमुळे तुमचे पोट वाढू शकते ?  

1)Cushing’s Syndrome-

कुशिंग सिन्ड्रोमलाच हायपरकोर्टिसोलिझम असे देखील म्हणतात. जेव्हा तुमच्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढते तेव्हा तुम्हाला हा विकार होऊ शकतो.जरी हा विकार बरा होत असला तरी तो गंभीर स्थितीत असेल तर मात्र त्याची लक्षणे आयुष्यभर तशीच राहतात. 

लक्षणं -

या विकाराची लक्षणे विकाराच्या तीव्रतेवर अवलंबून असतात.शरीराच्या मधल्या भागात फॅटी टीश्यू जमा होणे.
पाठीच्या वरच्या भागात विशेषत: खांद्यामध्ये चरबी जमा होणे ज्यामुळे तिथे व्यंग निर्माण होते.
चेहरा सुजणे
हात,छाती,पोट व मांड्यावर १ सेमी रुंदीच्या गुलाबी अथवा जांभळ्या रंगाचे स्ट्रेच मार्क दिसणे.
सहज जखम होणे.
थकवा
शरीरावर अनावश्यक केसांच्या वाढीसह मासिक पाळीमध्ये अनियमितता येणं .
लिबीडो कमी होणे व पुरुषांमध्ये इरेक्शन होताना समस्या येणे.
कॉग्नेटीव्ह डिसफंक्शन,डिप्रेशन,कुशिंग सिड्रोंमसह ७० ते ८५ टक्के लोकांमध्ये चिडचिडही जाणवते. 

काय उपाय कराल -
Cushing’s Syndrome साठी शस्त्रक्रिया हा उपचार करण्यात येतो. त्यासोबत काही औषधे देण्यात येतात.

2) हर्निया-

हर्निया म्हणजे पोटामधील एखादा अवयव अथवा फॅटी टीश्यू पोटाच्या त्वचेसह बाहेर येऊन फुगवटा तयार होणे.पोटाची त्वचा कठीण टीश्यूने तयार झालेली असते.पोटाचा आतील भाग कमजोर झाल्यास हर्निया वाढतो. हर्नियाचे जांघेत,वरच्या मांड्यांना, बेंबीवर ,पोटाच्या वरच्या भागात,किंवा आतड्याचा भाग बाहेर आल्याने हा त्रास होतो. 

लक्षणं काय असतात ? 
त्या भागात फुगवटा येणे(कदाचित त्रासदायक असू शकतो अथवा नसू शकतो.)
पोट जड वाटणे
वजन उचलताना तीव्र वेदना

उपाय काय कराल  ? 
सामान्यत: लहान मुलांना Umbilical hernia(बेंबीवर)होतो पण पोटाचे स्नायू मजबूत झाले की तो आपोआप बरा देखील होतो.पण इतर हर्निया मात्र आपोआप बरे होत नाहीत.डॉक्टर याबाबत वाट पाहून निर्णय घेण्याचा सल्ला देतात.
जर उपचार करण्याची गरज असेल तर शस्त्रक्रिया हा त्यावर एकमेव उपाय असतो.शस्त्रक्रिये द्वारे हर्निया पोटात पुन्हा मागे ढकलण्यात येतो.

3) मेनोपॉज-
मेनोपॉज हा कोणताही विकार अथवा आजार नाही.ही महिलांच्या आयुष्यातील एक स्थिती असून या काळात माहिलांची मासिक पाळी येणे बंद होतेे.तसेच मॅनोपॉजनंतर गर्भाशयात आवश्यक प्रमाणात हॉर्मोन्सची निर्मिती होणे थांबल्यामुळे ती स्त्री पुन्हा कधीही गरोदर होऊ शकत नाही.महिलांना जेव्हा या काळात १२ महिन्यांपेक्षा अधिक काळ मासिक पाळी येत नाही तेव्हा  मॅनोपॉज ही स्थिती आलेली असू शकते.
लक्षणं 
रात्री घाम येणे, गरम वाटणं
योनीमार्ग कोरडा होणे
मूड स्वींग
झोपमोड होणे
मॅनोपॉजमुळे पोटाची चरबी वाढते.कारण या काळामध्ये शरीरातील oestrogen ची पातळी कमी झालेली असते.या हॉर्मोनमुळे अवयवांमधील चरबी पोटामध्ये साठू लागते.जर्नल मेटाबॉलिझम मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानूसार मॅनोपॉजच्या काळात चरबीचे वितरण न झाल्यामुळे महिलांच्या पोटात खोलवर चरबी साठू लागते.पण मॅनोपॉजनंतरही महिलांच्या पोटामध्ये चरबी वाढतच असते असे आढळले आहे.

                                     पोटावर चरबी साठणे धोकादायक असू शकते.जर तुम्हाला वर दिलेल्या आरोग्य स्थितीमुळे पोटावर चरबी जमा होत नाही असे वाटत असेल तर तुमच्या जीवनशैलीत बदल करा. आणि वाढलेले पोट कमी करा.यासाठी वेळेवर झोपा,नियमित व्यायाम करा,योग्य आहार घ्या व ताण-तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.