तुमचं आरोग्य जपायला गणपती बाप्पाही देतो ही ९ हेल्थ सिक्रेट्स !

६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्‍या गणपतीचे पूजन करून मगच नव्या कार्याला सुरूवात केली जाते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असेल. घराघरात गणपती बाप्पा विराजमानही होतील . मग त्या विलोभनीया मूर्तीकडे पहा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी बाप्पााकडून या १० गोष्टींचे अनुकरण जरूर करा.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Aug 23, 2017, 04:58 PM IST
तुमचं आरोग्य जपायला गणपती बाप्पाही देतो ही ९ हेल्थ सिक्रेट्स !  title=

मुंबई : ६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्‍या गणपतीचे पूजन करून मगच नव्या कार्याला सुरूवात केली जाते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असेल. घराघरात गणपती बाप्पा विराजमानही होतील . मग त्या विलोभनीया मूर्तीकडे पहा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी बाप्पााकडून या १० गोष्टींचे अनुकरण जरूर करा.

१) मोठं डोकं – ज्ञानाचे भंडार
एखाद्याचे अनुकरण करून तुम्ही साईझ झिरो किंवा सिक्स पॅक अ‍ॅब्सची तयारी करत असाल किंवा एखादा ड्रेस तुम्हांला फीट व्हावा म्हणून तुम्ही वजन घटवण्याच्या किंवा व्यायामाच्या मागे लागत असाल. मात्र त्यापेक्षा स्वतःच्या हितासाठी स्वतःकडे लक्ष द्या. तुमची प्रगती व सोबतीला मानसिक, शारीरिक संतुष्टता मिळावी यासाठी प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही आयुष्यात सुखी व्हाल.
२) मोठे कान- अधिक दक्षतेने ऐका
डोकेदुखी झाली की गोळ्या घ्या. पोटात गडबड झाली की काही घरगुती उपाय करा. पण हे आजार वाढून गंभीर होण्यापेक्षा वेळीच त्यावर  नियंत्रण मिळवण्यासाठी शरीराकडून वेळोवेळी मिळणारे संकेत ऐका. यासाठी वेळोवेळी मेडीकल चेकअप करा. वाढलेले वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्यदायी पद्धतींचा वापर करा.
३) नाजून डोळे – अधिक एकाग्रता
जीवन कधीच स्थिर किंवा आपल्याला अपेक्षित वेगाने जात नाही. ते प्रवाही आणि वर-खाली जाणारे असते. त्यामुळे तुम्हांला नेमकी कशाची गरज आहे. त्या गोष्टींची निवड  करा आणि त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा. यामध्ये अधिक फीट राहण्याचा प्रयत्न असेल किंवा तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तुमचे लक्ष्य निवडा आणि त्यासाठी मेहनत घ्या.
४) हातातील अस्त्र – लक्ष्याकडे अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न
अस्त्राप्रमाणे तुमच्याकडील शक्ती वापरून तुम्ही मार्गात येणार्‍या अडथळांवर मात करायला शिका. प्रामाणिक प्रयत्न केलेत तर काहीही जिंकता येते. मात्र जिद्द न हरता येणार्‍या अडथळ्यांवर तुमच्या सद्गुणांनी मात करा.
५) एकदंत – चांगल्या गोष्टीचा प्रसार करा, वाईट गोष्टी सोडून द्या
तुमच्या बाबतीत झालेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करा. तुमच्या झालेल्या टीकेला सकारात्मकतेने घ्या. म्हणजे वाईट गोष्टी, अवगुण यांना बाहेर टाकून नव्या आणि चांगल्या गुणांना आत्मसात करा.
६) सोंड – परिस्थितीनुसार बदलांना तयार रहा  
जीममध्ये न जाण्याची, व्यायाम टाळण्याची अनेक कारणं आपल्याकडे तयार असतात. मात्र असे करणे टाळा.  संकंटांपासून पळणे टाळा. परिस्थितीनुसार बदल करायला शिका.  अनेकदा आपण परिस्थिती नाकारताना अनेक कारणं देण्यास तयार असतो. हे टाळा.
७) उंदीर – लहानसे वाहन 
गणेशाचे इटूकले वाहन उंदीर आहे. त्याचप्रमाणे आपल्या अवाजवी इच्छा-आकांक्षाही लहान ठेवा. तुम्ही डाएटवर असतानादेखील एक एक्स्ट्रा गुलाबजाम, केकचा तुकडा, सिगारेट पिण्याची इच्छा. अशा केवळ क्षणिक आनंद देणार्‍या गोष्टींवर नियंत्रण मिळवा.
८) लंबोदर- लहान-मोठ्या सार्‍या गोष्टी पचवण्याची क्षमता ठेवा 
आयुष्य कधीच स्थिर नसते. त्यात चढ-उतार येतच राहणार. मग अशावेळी त्याचा स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा सत्य स्विकारायला शिका. तुम्ही स्वतःला जितका त्रास करून घ्याल तितक्या तुमच्या आरोग्यविषयक समस्या वाढत जातील.
९) छोटे तोंड – कमी बोला 
कमीत कमी बोला आणि तो वेळ अधिकाधिक काम करण्यात गुंतवा. यामुळे तुमची कामं पटापट होतील. अचानक आलेले काम, किंवा जीवनात आलेले अडथळे पाहून थकून किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करत न बसता ते पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्या.