मुंबई : लिव्हर म्हणजे यकृत आपल्या शरीरात प्रमुख अंगापैकी एक. लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून अन्न पचनासाठी मदत करते. लिव्हरचे कार्य बिघडणे आरोग्यासाठी घातक ठरते. एक खास ड्रिंक जे यकृतातील विषारीद्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते. पाहुया ते कसे तयार करायचे...
हे खास ड्रिंक बनवण्यासाठी २ कप पाणी उकळवा. पाणी उकळू लागल्यावर त्यात काही मनुके घाला. त्यानंतर ते २० मिनिटे मंद आचेवर शिजवा. त्यानंतर हे पाणी रात्रभर थंड होण्यसाठी ठेवा.
हे ड्रिंक रोज प्या. पाण्यात मधेच येणारे मनुके फेकण्याची चूक करु नका. नाश्ताला देखील तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता. हे ड्रिंक तीन दिवस नियमित घ्या. याच्या सेवनाने लिव्हर स्वच्छ होईल आणि पोटासंबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.