मुंबई : देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला. कोरोनाला प्रतिबंध व्हावा यासाठी गेल्या देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी काहींनी दोन्ही डोस घेतले असून काहींचा पहिला डोस झालेला आहे. मात्र मध्यकाळात लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना दुसरा डोस मिळू शकलेला नाही. लसीचा दुसरा डोस लांबल्यामुळे लोकांच्या मनात मात्र विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान तुमच्या मनात असलेले असेच काहीसे प्रश्न आणि त्यांची उत्तर या आर्टिकलच्या माध्यमातून मिळू शकणार आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे कोव्हिशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मजबूत एँन्टीबॉडीज प्रतिक्रिया देत नाही. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी दुसऱ्या लसीची आवश्यकता असते. दरम्यान कोव्हिशिल्डचा पहिला डोस खूप परिणामकारक असतो. त्यामुळे तो व्हायरसपासून वाचण्यासाठी दीर्घकाळ इम्युनिटी देत. लॅंसेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, 12 आठवड्यांच्या अंतराने कोव्हिशिल्डचा डोस घेतल्यावर त्याचा परिणाम चांगला असतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, शक्य असल्यास दिलेल्या वेळेत लसीचा दुसरा डोस घ्यावा. मात्र काही कारणाने जर दुसरा डोस घेता आला नाही तर घाबरण्याची गरज नाही. लोकांच्या मनात एक प्रश्न असतो की, वेळेवर दुसरा डोस नाही घेतला तर पहिला डोस वाया जातो आणि पहिल्या डोसपासून पुन्हा सुरुवात करावी लागते. लसीचा प्रभाव कमी होतो यावर काही संशोधन झालेलं नाही.
लसींची कमतरता असेल किंवा इतर अन्य कारणांमुळे लसीचा दुसरा डोस मिळाला नाही तर तो 10-15 दिवस लांबला तर काही समस्या नाही. त्यानंतर देखील तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. यावेळी पहिल्या डोसच्या मेमरी सेल उपस्थित असतात. त्यामुळे दुसऱ्या डोसनंतर देखील पूर्णपणे अँन्टीबॉडीज मिळतात.
संशोधकांच्या मताप्रमाणे, पहिल्या डोसनंतर व्हायरसच्या विरूद्ध शरीराची प्रतिकार क्षमता तशीच राहते. अशात जर तुम्ही व्हायरसच्या संपर्कात आलात तर ही प्रतिकार क्षमता पुन्हा अॅक्टीवेट होते. मात्र प्रत्येक रूग्णासोबत असंच होईलच असं नाही. जर वॅक्सिनेशननंतरही रूग्णाच्या शरीरात प्रतिकार शक्ती तयार होत नसेल तर बूस्टर डोसची गरज भासते.
जर तुम्हाला कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाली तर तुम्हाला दुसरा डोस घेण्यासाठी 2-3 महिने थांबण्याचा सल्ला दिला जातो. कारण संक्रमणानंतर शरीरात पुन्हा एँन्टीबॉडीज तयार होण्यास सुरुवात होते.