मुंबई : अयोग्य आहार आणि चुकीची जीवनशैली यामुळे झोप योग्य प्रमाणात होत नाही. चांगला आहार, व्यायाम यांच्याप्रमाणेच झोपंही तुमच्या शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. चांगली झोप होण्यासाठी दिवसातून ८ तास झोप घेणं आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ज्या व्यक्तीला 8 तासांची झोप मिळत नाही त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो.
सध्या टेक्नॉलॉजीने भरलेल्या जगाने आपली संपूर्ण दिनचर्या बिघडवली आहे. कामाचा ताणामुळे अनेकजण शांत झोपेसाठीही खूप प्रयत्न करतात. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर काळजी घ्या आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. कमी झोप घेतल्याने तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्या सांगण्यानुसार, जेव्हा तुम्ही पूर्ण झोप घेत नाही त्यावेळी तुम्हाला गरजेचा असलेला व्यायाम मिळत नाही. परिणामी यामुळे स्ट्रेस आणि तणावात वाढ होते. याचा थेट परिणाम कामावर होतो.
झोपेच्या कमतरतेचा शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल, तर मेंदूची क्षमता कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो.
पुरेशा प्रमाणात झोप न घेतल्याने शरीराच्या मेटाबॉलिजम प्रक्रिेयवर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे शरीरात चरबी वाढू लागते. अशा परिस्थितीत हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
जर एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा त्याच्या प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो. एका संशोधनातून देखील ही गोष्ट समोर आली होती. ज्यातून हे सिद्ध झालेलं की, इम्युनोलॉजिकलचा झोपेशी जवळचा संबंध आहे. अशा परिस्थितीत जेव्हा झोपेवर परिणाम होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवरही होतो.