Poha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?

Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते. 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 18, 2023, 02:12 PM IST
Poha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?  title=
Poha VS Rice

Rice vs Poha Benefits : घरी पाहुणा आले किंवा आपण कुणाच्या भेटीला त्याच्या घरी गेलो की, सहसा नाश्ता म्हणून समोर येणारा पदार्थ म्हणजे पोहे. भारतीयांच्या आहारातील हा एक प्रमुख घटक आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याचे खूप फायदे आहेत. चव आणि आरोग्याचे संतुलन ठेवणाऱ्या पोह्याचे अनेरक फायदे आहेत. सध्या खाणपाणाच्या बिघडलेल्या सवयींमुळे अनेक आजारांना सामारे जावं लागतं. तर दुसरीकडे भात (rice) आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसते, असे म्हटले जाते.  कारण भातात आर्सेनिकचे भरपूर प्रमाण असते. कंझ्युमर रिपोर्ट्समध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, आर्सेनिकच्या अतिसेवनामुळे त्वचा, मज्जासंस्था आणि फुफ्फुसांशी संबंधित आजार जडून आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

साध्या पोह्यांमध्ये चरबी आणि साखरेचा कोणतेही प्रमाण नसते. पोह्यामध्ये (Rice vs Poha) पालेभाज्या टाकून तेलाची फोडणी दिल्यानंतरही त्याच्यातील पौष्टिक गुणात  कोणताही बदल होत नाही. पण पोहे बनवताना चांगल्या वॉटरक्रेसचा वापर करायला हवा. 

आतडे निरोगी ठेवण्यासाठी पोहे उत्तम

पोहे बनवण्यासाठी फर्मेंटेशन प्रक्रिया वापरली जाते. त्यात प्रथिने आणि कर्बोहायड्रेटच्या मेटाबॉलिझममधूम तयार झालेल्या चांगल्या बॅक्टेरियांचा समावेश असतो. या बॅक्टेरियामुळे आतडे निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. मात्र भातापासून हा फायदा मिळत नाही. आपण नाश्ता करणार नसला तर दुपारच्या जेवणातबी पोह्यांचा समावेश करु शकता. मुलांनाही पोहे खूप आवडत असतात. 

पोह्यात भरपूर फायबर

पोह्यातून भरपूर फायबर मिळतं. 100 ग्रॅम पोह्यांपासून 2 ते 4 ग्रॅम फायबर आणि सुमारे 70 ग्रॅम निरोगी कार्बोहायड्रेट्स उपलब्ध आहेत. पोह्याला भातासारखे पॉलिश केले जात नाही. पोहे खाल्ल्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

पोह्यापासून भरपूर प्रमाणात लोह 

पोह्यांमध्ये लोह भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. यामुळे अॅनिमियाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात पोह्यांचा समावेश करावा. पोह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर

पोहे हलके असल्याने ते पचायला सोपे जाते. पोहे खाल्ल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. यामध्ये कॅलरीफिक मूल्याचा अभाव आहे. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना पोहे खाल्लं तर फायदा मिळू शकतो. 

जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात 

पोहे बनवण्यासाठी लसूण, कांदा आणि टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. या कारणामुळे पोहे खाल्ल्याने शरीराला अनेक पौष्टिक घटक मिळतात. यामधील हिरवी मिरची आणि लिंबू शरीरातील ‘सी’ ची कमतरता दूर करण्यास मदत करतात. 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)