हनीमून प्लॅन करताय? भारतातल्या 'या' तीन ठिकाणांना जरूर भेट द्या

तुळशीच्या लग्नानंतर विवाहसोहळ्यांसाठी सुरुवात होते. नोव्हेंबर महिना हा लग्न करण्यासाठी योग्य आहे.

Updated: Nov 7, 2022, 08:49 PM IST
हनीमून प्लॅन करताय? भारतातल्या 'या' तीन ठिकाणांना जरूर भेट द्या title=
Planning a honeymoon Must visit these three places in India nz

Best Destination For Honeymoon in Novemeber : तुळशीच्या लग्नानंतर विवाहसोहळ्यांसाठी सुरुवात होते. नोव्हेंबर महिना हा लग्न करण्यासाठी योग्य आहे. हा महिना फारसा थंड किंवा उष्ण नसतो त्यामुळेच अनेकजण या महिन्यात लग्न करण्यास प्राधान्य देतात. नोव्हेंबर महिना लग्न समारंभासाठी शुभ मानला जातो. जोडपे आपला हनिमून साजरा करण्यासाठी नोव्हेंबर महिना निवडतात. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात हनिमून साजरा करण्यासाठी रोमँटिक डेस्टिनेशन शोधत असाल तर तुम्ही दक्षिण भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता. जाणून घेऊया... (Planning a honeymoon Must visit these three places in India nz)

हे ही वाचा - प्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO

1. हंपी

जर तुम्ही इतिहास प्रेमी असाल तर तुमचा हनीमून हम्पीमध्ये साजरा करा. इतिहासाची पाने फिरवल्यास विजयनगरची राजधानी हंपी असल्याचे लक्षात येते. विजयनगर हे १४व्या शतकातील सर्वात मोठे राज्य होते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत हम्पीला जाऊ शकता. हे शहर कर्नाटकच्या उत्तरेस असून तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे.

हे ही वाचा - तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा

2. कुर्ग
 
दक्षिण भारतातील सुंदर शहरांमध्ये कुर्गची गणना होते. याला कॉफीचे शहर म्हणूनही ओळखले जाते. हे शहर आपल्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कुर्गला भेट देण्यासाठी येतात. याशिवाय कूर्ग हे रोमँटिक हनीमून डेस्टिनेशनसाठी ओळखले जाते. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी हनीमूनसाठी कुर्गला जावे.

हे ही वाचा - आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष ठरलं 'लकी'... जाणून घ्या एका क्लिकवर

 

3. केरळ

केरळ हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. या राज्यात एक नाही तर अनेक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. मुन्नार हे मुख्य ठिकाणांपैकी एक आहे. यासाठी केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 16शे मीटर आहे. मुन्नार हिल स्टेशनवर चहाची लागवड केली जाते. हिल आणि टी गार्डनमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत परफेक्ट फोटोशूट करू शकता.