मुंबई : मुलं ही थोडी खोडकर आणि मस्ती खोर असतातंच. परंतु मुलांनी अती उद्धट किंवा बिघडलेली असू नये. प्रत्येक पालकांसाठी बिघडलेल्या मुलांची व्याख्या वेगळी असू शकते. मुलांचा प्रत्येक गोष्टीला नकार देणे, उलटं बोलणे, भांडणे, मित्रांशी भांडणे, अन्न फेकणे आणि जिद्द करणे या अशा काही वाईट सवयी मुलांना असू शकतात. बहुतेक मुले त्यांच्या आईच्या खूप जवळ असतात, त्यामुळे अशा स्थितीत मूल बिघडल्यावर त्याला सुधारण्याची जबाबदारी फक्त आईच उचलू शकते.
परंतु आपल्या बिघडलेल्या किंवा आगाऊ मुलाला कसं ठिक करावं हे, हे काही पालकांना माहित नसतं. तर अशा पालकांसाठी या 5 गोष्टी मदत करतील. मुलांच्या वाईट सवयी सुधारण्यासाठी पालकांसाठी टिप्स
प्रत्येक वेळी मुलाचे रडणे शांत करण्यासाठी पालकांनी मुलांचे ऐकने चुकीचे आहे. कारण असं केल्याने मुलांना देखील समजतं की आपल्याला रडल्याने सगळ्या गोष्टी मिळतात. ज्यामुळे मग पुढे जाऊन मुलं हट्टी होतात. आई म्हणून तुम्ही मुलाला नाही म्हणण्याची सवय लावली पाहिजे आणि वडिलांनाही सांगा की तुम्ही मुलाला डोक्यावर घेऊ नका.
घरात असे काही नियम असले पाहिजेत, जे केवळ मुलांनीच नाही तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पाळले पाहिजेत. जेवताना फोन हातात घेऊ नका, हिरव्या भाज्या जरूर खाव्यात, रोज बाहेर जेवताना रडू नका किंवा चूक झाली, तर समोरून माफी मागू नका, हे काही चांगले नियम आहेत. ज्यामुळे मुलांना देखील नियम पाळण्याची शिस्त लागते.
अनेक वेळा आई घरातील किंवा ऑफिसच्या कामात एवढ्या व्यस्त असतात की त्यांना मुलाचे ऐकायला वेळ मिळत नाही. मुलाच्या आरोग्यासोबतच त्याचा आनंदही तुमच्या हातात असतो. आईचे लक्ष वेधण्यासाठी मुले अनेकदा खोड्या करतात, ज्यामुळे एखाद्याचे नुकसान होऊ शकते, तसेच दुर्लक्ष केल्यामुळे ते चिडतात.
मुलासोबत बसा आणि त्याचं संपूर्ण ऐकून घ्या. तसेच मुलांना अनेक गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी का चुकिच्या आहेत. हे समजावून सांगा.
मुलाच्या चांगल्या कृतींचे कौतुक करून, त्यांना समजू सांगा की, कोणत्या कामाची त्यांच्या प्रशंसा होईल आणि कोणत्या नाही. हे देखील त्यांना समजवा. शिवाय मुलांना थोडं कष्ट करु द्या.
मुलांना छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहण्याची आणि प्रत्येकाप्रती संवेदनशील राहण्याची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे.