Nails Care Tips: अशी घ्या तुमच्या नखांची काळजी, नाहीतर पडेल महागात

अनेक वेळा आपल्या नखांची काळजी घेत असताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे आपवं नुकसान होते.

Updated: Jun 4, 2022, 06:31 PM IST
Nails Care Tips: अशी घ्या तुमच्या नखांची काळजी, नाहीतर पडेल महागात title=

मुंबई : आपल्याला बऱ्याचदा आपल्या शरीराकडे पाहण्यासाठी वेळ नसतो. त्यातच आपण कसा बसा वेळ काढून शरीर, केस आणि आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी काहीतरी उपाय करतो. परंतु अशा परिस्थितीत लोक त्यांच्या नखांकडे फारसं लक्ष देत नाहीत. नखांना वेळोवेळी कापणे, त्यांना स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. खरंतर मॅनिक्युअर करुन आपल्या हातांचे सौंदर्य वाढवू शकतो. परंतु अनेक लोकांना याबद्दल माहिती नसते किंवा काहीजणांना असं करणं महत्वाचं वाटत नाही.

अनेक वेळा आपल्या नखांची काळजी घेत असताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे नुकसान होते. याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण नखांवरूनच आपलं आरोग्य कळतं. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या चुका न केल्याने नखांचे आरोग्य चांगले राहते. चला याबद्दल जाणून घेऊ या...

मॉइस्चराइज(moisturize)

नखे कापल्यानंतर अनेकदा लोक हातांना मॉइश्चरायझ करणे विसरतात, त्यामुळे हातातील मॉइस्चराइज (dry nails) किंवा आद्रता संपते, अशा स्थितीत नखे कापल्यानंतर नेहमी मॉइश्चरायझेशन केले पाहिजे जेणेकरून हातांचा ओलावा टिकून राहील.

कोरडी नखं (dry nails)

कोरडी नखे जड असतात त्यामुळे नखे कापणे कठीण होते. हे बहुतांशी उन्हाळ्यातच घडते, अशा परिस्थितीत नखे कापण्यापूर्वी त्यांना थोडे मऊ करावे म्हणजे नखे कापताना जास्त त्रास होणार नाही. ते मऊ करण्यासाठी, ते कापण्यापूर्वी आपला हात कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवा, जेणेकरून तुमची नखे थोडी मऊ होतील.

खराब खाण्याच्या सवयी

आपल्या नखांना निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या आहारात असलेले पौष्टिक अन्न आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या नखांसाठीही फायदेशीर आहे. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, आहारात आढळणारे केराटिन आपले केस, नखे आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. चांगल्या आहाराअभावी तुमची नखं कमकुवत होतात आणि त्यांची चमक कमी होते.