Childhood Depression Symptoms : तणाव किंवा स्ट्रेस हा काही फक्त मोठ्या माणसांनाच असतो असे नाही, लहान मुलांना देखील स्ट्रेस जाणवू शकतो. फक्त त्याची कारणे वेगळी असतात आणि काही वेळा ती कारणे मोठ्या माणसांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे मुलांच्या तणावाकडे दुर्लक्ष केले जाते. आज आपण लहान मुलांना सामोरे जावे लागणारे ताण-तणाव, त्यांची कारणे आणि तणावात असणाऱ्या मुलांचे वागणे ह्या महत्वाच्या विषयावर जाणून घेणार आहोत...
आपल्या मुलाचा मूड कसा आहे हे पालकांनी जाणून घेतले पाहिजे. तो काय विचार करतो, त्याचे विचार किंवा त्याच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे आहेय. त्यामुळे आपल्या मुलांना रोज थोडा वेळ द्या. मुलाचा दिवस कसा गेला, त्याने दिवसभर काय केले, असे प्रश्न मुलांना विचारा.
तुमच्या मुलांचे म्हणणे ऐका, त्यांना प्रोत्साहित करा आणि त्यांना त्यांचे विचार आणि भावना शेअर करताना सुरक्षित वाटेल याची खात्री करा. मुलांचे ऐकताना त्यांच्या प्रश्नाला प्रतिसाद द्या.
वाचा: वाईट काळात अशा लोकांकडून कधीच मदत मागू नका!
आपल्या मुलाने जे चांगले केले त्याबद्दल त्यांची प्रशंसा करा. चांगले कामं करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. आयुष्याचे सकारात्मक पैलू त्यांना अनुभवातून पटवून द्या. आपल्या मुलाला कधीही एकटे वाटणार नाही याची खात्री करा. त्यांना खात्री पटून द्या की काहीही सांगायचे असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी कायम उपलब्ध असाल..
तुम्ही मुलाच्या वागण्याकडे लक्ष देऊ शकाल किंवा त्यांना काही समस्या असतील तर तुम्ही त्यांना दररोज तुमचा थोडा वेळ द्या. दैनंदिन कामाच्या व्यस्ततेमुळे बहुतेक पालक मुलाकडे पाहिजे तितके लक्ष देत नाहीत. मुल अनेकदा पालकांचे लक्ष वेधण्यासाठी अशा गोष्टी करतात, जे चुकीचे आहे.
केवळ प्रश्न आणि उत्तरे विचारून मुलाच्या मनाची स्थिती समजून घेणे सोपे नाही. मूल एखाद्या गोष्टीवरुन घाबरत असेल तर चूक केली असेल आणि तुम्हाला सांगण्यास कचरत असेल. पालकांनी मुलाला खात्री देणे आवश्यक आहे की तो त्यांच्यासोबत आहे. तुम्हाला कसे वाटते ते त्यांना सांगा आणि त्यांनाही प्रेरणा द्या.