सुगंधित डिटर्जेंट पाडतंय तुम्हाला आजारी? डिटर्जेंटमुळे डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन?

डिटर्जेंटमध्ये केमिकल्सचा अधिक वापर केल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं. हा दावा केल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

Updated: Apr 25, 2023, 10:51 PM IST
सुगंधित डिटर्जेंट पाडतंय तुम्हाला आजारी? डिटर्जेंटमुळे डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन?  title=

सध्या असा दावा करण्यात येतोय की, डिटर्जेंट-साबणामुळे तुम्ही आजारी पडू शकता. डिटर्जेंटमध्ये केमिकल्सचा अधिक वापर केल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं. हा दावा केल्याने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

अनेक महिला डिटर्जेंटचा वापर करतात. कपडे धुण्यासाठी डिटर्जेंटचाच वापर करतात. त्यामुळे हा आरोग्याचा विषय असल्याने यामागे काय सत्य आहे हे तपासून पाहिलं.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

काय आहे व्हायरल मेसेज?

कपडे धुण्याच्या डिटर्जेंटमध्ये अॅसिड असतं. डिटर्जेंटमध्ये हार्ड केमिकल्स असतात.सोडियम लॉरेल सल्फेट, सल्फर ट्राईऑक्साईड, एथिलीन ऑक्साईड असे केमिकल्स असल्याने त्वचेसह डोळे, फुप्फुसाला इन्फेक्शन होऊ शकतं. 

मात्र या हे सत्य आहे का? तपासणीनंतर काय सत्य समोर आलं?

  • डिटर्जेंटमुळे डोळ्यांना, फुप्फुसांना इजा होत नाही
  • कपडे धुताना पाण्यात जास्त वेळ राहू नये
  • हाताला जखम असल्यास डिटर्जेंटमुळे इन्फेक्शन होऊ शकते
  • डिटर्जेंटमुळे सोरायसिस होण्याचा धोका नाही

पडताळणी केल्यानंतर हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील डिटर्जेंटमध्ये काही केमिकल्स वापरले जातात. मात्र, असं असलं तरी कंपनी बनवताना सुरक्षेचा विचार करून बनवते. तरी देखील डिटर्जेंट वापरताना खबरदारी घेतली पाहिजे.