पालकांनो सावधान! ऑनलाईन गेमिंगमुळे मुलं बनतायत चोर?

लहान मुलांची अशा काही वाईट सवयी असतात ज्याबद्दल प्रत्येक पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे

Updated: Aug 31, 2021, 01:13 PM IST
पालकांनो सावधान! ऑनलाईन गेमिंगमुळे मुलं बनतायत चोर? title=

मुंबई : लहान मुलांची अशा काही वाईट सवयी असतात ज्याबद्दल प्रत्येक पालकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण जर तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष दिलं नाही तर ही गोष्ट तुमच्या खिशावर आणि तुमच्या मुलाच्या आयुष्यावरही भारी पडू शकते. ऑनलाइन गेम खेळणं हे एक व्यसन आहे. नुकतंच मुंबईत राहणाऱ्या 16 वर्षांच्या मुलाला ऑनलाइन गेम खेळण्याची आवड आणि यासाठी त्याने त्याच्या आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये काढले.

त्यामुळे सध्या ऑनलाईन गेम हे लहान मुलांसाठी एक व्यसन बनताना दिसतंय. गेल्या वर्षी भारतात झालेल्या एका सर्वेक्षणात, 20 वर्षांखालील 65 टक्के मुलांनी कबूल केलं होतं की, ते ऑनलाइन गेम खेळण्यासाठी खाणं आणि झोप सोडण्यास तयार आहेत. शिवाय अनेक मुलं यासाठी त्यांच्या पालकांचे पैसेही चोरत असल्याचं समोर आलं होतं.

गेम्सच्या लूट बॉक्सवर मुलं इतके पैसे करतात खर्च

70 टक्के ऑनलाइन गेम दरम्यान लूट बॉक्स सारखी वैशिष्ट्ये मुलांना आकर्षित करतात. हे लुट बॉक्स पैशाने खरेदी करता येतात. हे लूट बॉक्स उघडल्याने गेममध्ये पुढच्या लेवला पोहोचणं सोपं जातं. ब्रिटनमध्ये 19 वर्षांखालील 11 टक्के मुलांनी हे लुट बॉक्स खरेदी करण्यासाठी त्यांच्या पालकांकडून 1 हजार 130 कोटी रुपये चोरले. 2018 मध्ये, जगभरातील गेमर्सनी लूट बॉक्स खरेदी करण्यासाठी 2 लाख 25 हजार कोटी खर्च केले. तर 2025 सालापर्यंत गेमर लूट खरेदीवर 3 लाख 75 हजार कोटी रुपये खर्च करण्यास सुरुवात करतील. हा आकडा शिक्षा आणि आरोग्याच्या बजेटपेक्षा जास्त आहे.

50% पेक्षा जास्त मुलांमध्ये इंटरनेटचं व्यसन

2020 मध्ये दिल्ली आणि जवळपासच्या शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की, इथल्या 50 टक्क्यांहून अधिक मुलांना इंटरनेटचं व्यसन लागलं आहे. हे व्यसन त्यांना चोरी करायला शिकवू शकते आणि त्याला मानसिक आजारी देखील बनवू शकते. 

गेमिंग डिसऑर्डरचं निदान होणं कठीण

केवळ खेळावर लक्ष केंद्रित आणि ध्येय फक्त जिंकणं असतं गेमिंगमध्ये हरवलेल्या लोकांचं जग. एका निष्पाप 2 वर्षांच्या मुलापासून ते 40 वर्षांच्या व्यक्ती गेमिंग डिसऑर्डरपर्यंत कधी आणि कशी पोहोचते, हे देखील कळत नाही. गेम खेळताना तुमचे हृदय आणि मन त्याच्या व्यसनाच्या आहारी जाते.

गेमिंगचं व्यसन लागल्याची लक्षणं

न्यू मेक्सिको विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, जगभरातील 15 टक्के गेमर्स व्यसनाधीन होतात आणि मानसिकरित्या आजारी पडतात. या रोगाची काही लक्षणं देखील आहेत, जी वेळेवर ओळखली गेली पाहिजेत.

  • गेम वगळता प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला वेगळं ठेवणं
  • भूक न लागणं
  • झोपेचा अभाव
  • खेळता येत नसताना चिडचिडे होणं
  • डोळे आणि मनगटांमध्ये वेदना

इतका वेळ गेम खेळण्यात काहीच नुकसान नाही

व्हिडिओ किंवा ऑनलाईन गेम खेळणारा प्रत्येकजण आजारी पडत नाही. आठवड्यातून 2-3 वेळा 20 मिनिटं ते 1 किंवा दोन तास घालवण्यात काहीच नुकसान नाही. परंतु जर आभासी जग तुमच्या मुलाचं जग बनलं तर तुमच्यासाठी ही एक चेतावणी आहे.