मुंबई : इन विट्रो फर्टिलायजेशन (IVF) मार्फत बाळाचा विचार करणाऱ्या कपल्ससाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी. संशोधकांनी असं एक उपकरण शोधून काढलं आहे ते अगदी सुदृढ आणि मजबूत शुक्राणुंना ओळखू शकतो. आतापर्यंत चांगल्या स्पर्मचा काऊंट शोधणं अतिशय कठीण आणि थकवणारे काम होते.
या टेस्टमध्ये आतापर्यंत अनेक तास लागायचे यामुळे स्पर्मची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता होती. पण या संशोधनामुळे तो प्रश्न देखील सुटला आहे. अमेरिकेतील कॉरनेल युनिर्व्हसिटीच्या मुख्याध्यापिका अलिरेजाने सांगितलं की, चांगल्या क्वालिटीचे स्पर्म ओळखण या आधी कठिण होतं. मात्र या नव्या उपकरणामुळे स्पर्म काऊंट ओळखणे सहज शक्य आहे.
या उपकरणामुळे अनेक तासांचा काम अगदी सहज 5 मिनिटांत होतात. चांगले स्पर्म तेच मानले जातात जे फ्लोच्या विरूद्ध दिशेला टिकून राहतात. यामुळे सर्वात प्रथम मायक्रेफ्लूडित चॅनल बनवलं. ज्यामद्ये स्पर्म तरंगतात आणि ही प्रक्रिया भिंतीप्रमाणे करते ज्यांमध्ये चांगले स्पर्म एका बाजूला होतात. हा रिसर्च पीएनएएस नावाच्या जर्नलमध्ये छापला आहे.