हे किमती फळ आरोग्यासाठी खूपच महत्वाचे, जाणून घ्या याचे 5 फायदे

Dragon Fruit Health Benefits: अनेकवेळा आपण फळे खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने कोणती फळे खावीत, हे तुम्हाला माहित आहे का?  

Updated: Mar 11, 2022, 02:00 PM IST
हे किमती फळ आरोग्यासाठी खूपच महत्वाचे, जाणून घ्या याचे 5 फायदे title=

मुंबई : Dragon Fruit Health Benefits: अनेकवेळा आपण फळे खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने कोणती फळे खावीत, हे तुम्हाला माहित आहे का? फळांचे फायदे सर्वांना माहीत आहेत. सर्व फळांचे स्वतःचे गुणधर्म असतात, जे आपल्या शरीराला पोषक घटक देतात. आज आम्ही अशाच एका फळाबद्दल बोलत आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. 'ड्रॅगन फ्रूट' (Dragon Fruit) असे या फळाचे नाव आहे. हे फळ आपल्याला निरोगी ठेवण्यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यास मदत करू शकते. मार्केटमध्ये त्याची किंमत 400 ते 500 रुपये किलो आहे. जरा वेगळे दिसणारे हे फळ आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

'ड्रॅगन फ्रूट' खाण्याचे 5 फायदे

1. डायबिटीजसाठी खूप फायदेशीर

मधुमेह (Diabetes) हा सर्वात धोकादायक आजारांपैकी एक आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स तसेच फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक अॅसिड, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि फायबर असतात. ते शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ज्यांना मधुमेह नाही त्यांच्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे हा मधुमेह टाळण्यासाठी एक पर्याय आहे.

2. हृदयविकार टाळण्यासाठी  

मधुमेहामुळे हृदयविकार (Dragon Fruit for the Heart) होणे ही एक सर्वसामान्य समस्या आहे. कारण शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा प्रभाव वाढतो. अशा परिस्थितीत अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी तुमच्याकडे फळांमध्ये एक उत्तम पर्याय असतो तो म्हणजे 'ड्रॅगन फ्रूट'.

3. कर्करोग प्रतिबंधासाठी ड्रॅगन फ्रूट

संशोधनानुसार, 'ड्रॅगन फ्रूट' कर्करोगासारख्या (Cancer) घातक आजारातही आराम देते. त्यात ट्यूमर, अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये आढळणारे हे विशेष गुणधर्म महिलांना स्तनाच्या कर्करोगापासून वाचवतात. याबाबत अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे.

4. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहील

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण (Cholesterol control) ठेवणेही आजकाल आव्हान बनले आहे. तुमच्या वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात अनेक गंभीर आजार होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असतो. यासाठी 'ड्रॅगन फ्रूट'चे सेवन फायदेशीर ठरू शकते.

5. पोटाच्या समस्या दूर होतात

पोटाच्या समस्यांपासून (stomach problems) आराम मिळवण्यासाठी 'ड्रॅगन फ्रूट'चे सेवन देखील केले जाऊ शकते. त्यात असणाऱ्या ऑलिगोसॅकराइड्सचे प्रीबायोटिक गुणधर्म आतड्यांतील निरोगी जीवाणूंना प्रोत्साहन देतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

 

(Disclaimer:  येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x