डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत

Nitin Desai Death : एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी ( Nitin Desai ) आत्महत्या केली आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान यावेळी ते ताणतणावात असून डिप्रेशनमध्ये ( Depression ) गेल्याचा दावा करण्यात येतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 2, 2023, 11:34 AM IST
डिप्रेशनमुळे आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचललं जाऊ शकतं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतायत title=

Nitin Desai Death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बुधवारी आत्महत्या केल्याचं समोर आलंय. एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी ( Nitin Desai ) आत्महत्या केली आहे. त्यांच्या या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली आहे. दरम्यान यावेळी ते ताणतणावात असून डिप्रेशनमध्ये ( Depression ) गेल्याचा दावा करण्यात येतोय. मात्र याची पुष्टी अजून करण्यात आलेली नाही. पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.  

मनात आत्महत्येची कल्पना येण्यास एकच कारणं कारणीभूत नसू शकतं. डिप्रेशनमुळे ( Depression ) लोकं आत्महत्येइतकं टोकाचं पाऊल उचलू शकतात, त्यामुळे मानसिक आरोग्य जपणं हे फार महत्त्वाचं आहे.  मात्र, डिप्रेशन ( Depression ) म्हणजे नेमकं काय ज्यामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो, या डिप्रेशनची जाणीव होणं गरजेचं आहेत.

डिप्रेशनची लक्षणं

  • सतत उदास वाटणं 
  • सतत निराश वाटून चिडचिड होणं
  • थकवा जाणवणं 
  • मन अस्वस्थ होणं
  • भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे
  • अचनाक काही कारण नसताना रडू येणं
  • कोणत्याही कामात रस न वाटणं
  • भूक कमी लागणं
  • जेवणाची इच्छा न होणं 
  • वजन कमी होणं

जर तुम्हाला कोणी डिप्रेशनमुळे आत्महत्येच्या विचारांबद्दल सांगितलं तर...

डिप्रेशनमध्ये असलेल्या व्यक्तीचं मानसिक स्वास्थ योग्य नसतं. अशावेळी जर तुम्हाला डिप्रेशनमुळे आत्महत्येचे विचार आल्याचं सांगितलं तर त्या परिस्थितीला तुम्ही कसं हाताळायचं? अशा वेळी डिप्रेशनमध्ये असेलल्या व्यक्तीचं संपूर्ण म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं. त्या व्यक्तीला मन मोकळं करण्यासाठी धीर द्यावा. शांत रहा कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. समोरच्या व्यक्तीची जी काही समस्या असेल ती समजून घ्या. त्यांच्या भावना समजून घ्या. परिस्थिती अधिक बिघडली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 

मुंबईतील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, डिप्रेशनमध्ये असलेली व्यक्ती आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू शकते. असं का होतं याचं कारण म्हणजे, भावनेच्या भरात व्यक्तीची विचार करण्याची क्षमता फेल होते आणि अशी परिस्थिती उद्भवते. अशावेळी समोरच्या व्यक्तीला आत्महत्येच्या विचारांबाबत हे स्पष्टपणे विचारलं पाहिजे. याशिवाय त्या व्यक्तीमध्ये काही लक्षणं दिसतायत का, यावर देखील लक्ष दिलं पाहिजे.