मुंबई : गुरुवारी राज्यात ओमायक्रोनचे रूग्ण आढळून आलेत. यामुळे आता आरोग्य विभाग अलर्टवर आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे 2 रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रोन महाराष्ट्राच्या जवळच्या राज्या असल्याने महाराष्ट राज्यची चिंता वाढली आहे. यानंतर राज्यामध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 28 संशयित रूग्ण आढळले आहेत.
राज्यात 28 ओमायक्रोनचे संशयित रूग्ण आढळून आलेत यात सर्वाधिक 10 जण मुंबईतील आहे. या सर्वांचे सँपल्स जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या सर्वांचे अहवाल येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबईतल्या 10 संशयितांच्या सँपल्समध्ये विषाणूवर एस.जेन सापडलं आहे. ओमायक्रोन विषाणूवर एस प्रोटीन नसतं. त्यामुळे हे रूग्ण ओमायक्रोनबाधित नसावेत असा संशय मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून व्यक्त करण्यात आला आहे आहे.
30 नोव्हेंबरपासून परदेशातून येणाऱ्या सर्वांच्या विमानतळावर चाचण्या केल्या जात आहेत. तसंच पॉझिटिव्ह आलेले सर्वांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्याही चाचण्या केल्या जात आहेत. गुरूवारपासून मुंबई महापालिकेने 861 जणांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 28 जण पॉझिटिव्ह आलेत. यातले 25 जण परदेशातून मुंबईत आलेत. तर तीन जण हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. यातले बहुतांश जण मुंबई पुणे आणि ठाणे जिल्ह्यातील आहेत.
दुसरीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात आपले हातपाय परसरण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 23 देशांत याची दहशत निर्माण झाली आहे. देशात आता कर्नाटकातल्या ऑमायक्रॉनबाधितांच्या संपर्कातील 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आले आहे. या सर्वांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.