Mulethi Benefits : घसा खवखवतोय? ही गोष्ट खाण्यास सुरु करा

रोज सकाळी उठल्यावर घसा खवखवतोय, 'या' गोष्टीचे सेवन करा

Updated: Nov 3, 2022, 12:05 AM IST
Mulethi Benefits : घसा खवखवतोय? ही गोष्ट खाण्यास सुरु करा  title=

मुंबई : जेष्ठमध (Mulethi) हे बहूगुणी औषध आहे.अनेक आजारावर व ते खुप फायदेशीर आहे. त्यामुळे आजारपणात त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सध्या अनेकांना रोज सकाळी घसा खवखवण्याचा त्रास होतोय. अनेकांना या समस्येमुळे खुप भीती वाटू लागली आहे. मात्र जर तुम्हाला घसा खवखवण्याचा, खराब होण्याचा अथवा खोकल्याचा त्रास असेल ज्येष्ठमधाचा (Mulethi Benefits) वापर करण्यास सुरूवात करा. कसे सेवन करावे जेष्ठमध.  

थंडीत हवामानातील आर्द्रतेमुळे विषाणू आणि जिवाणूंची वाढ होत आहे. त्यामुळे लोकांना घसा खवखवणे, सर्दी, खोकला, ताप अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आजारांवर एकच जालीम उपाय तो म्हणजे जेष्ठमध. तसेच डॉक्टर म्हणतात की बहुतेक वेळा घसा खवखवणे किंवा खोकला होत असेल तर जेष्ठमध (Mulethi) व्यतिरिक्त कोणतेही औषध घेण्याची गरज नाही.

ज्येष्ठमध चघळा

ज्येष्ठमध (Mulethi) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. खोकला, सर्दी आणि घसा खवखवण्यामध्ये त्वरित आराम मिळतो. ज्येष्ठमधमध्ये काहीही न घालता फक्त चावून खाल्ल्याने घशाला आराम मिळतो. 

ज्येष्ठमधाच पाणी

ज्येष्ठमध  (Mulethi Benefits) बारीक वाटून घ्या. एक ग्लास समान पाणी गरम करा. कोमट पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमध टाकून हळूहळू प्या. अशा प्रकारे रोज ज्येष्ठमध प्यायल्याने घशातील संसर्ग पूर्णपणे नाहीसा होतो.

ज्येष्ठमधाची चहा

ज्येष्ठमधाची  (Mulethi Benefits) चहा पिणे देखील घशासाठी फायदेशीर आहे. एक कप उकळत्या पाण्यात थोडे ज्येष्ठमधाचे तुकडे टाका आणि त्यात थोडे आले टाका, उकळल्यानंतर ते थोडे थंड करून हळूहळू प्या. 

ज्येष्ठमधाचा काढा

ज्येष्ठमधाचा (Mulethi) काढा पिणे देखील फायदेशीर आहे. साखर पावडर, काळी मिरी पावडर, तुळशीची काही पाने पाण्यात टाका. यासोबतच त्यात एक चतुर्थांश ज्येष्ठमधाची पावडर टाका. 5 मिनिटे उकळवून त्यात एक चमचा मध टाकून प्यायल्याने खूप आराम मिळतो. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Z24 तास याची पुष्ठी करत नाही.)