Morning Habits:सकाळच्या 'या' सवयी तुमचं वजन वाढतायत, जाणून घ्या

Bad Habits That Make You Fat : सकाळी आलार्म वाजून देखील न उठणे आणि उशिरापर्यंत झोपून राहणे, सकाळी सर्वात आधी कॉफी किंवा चहा पिणे, नाश्ता वगळणे अशा चुका अनेकजण करतात. या सकाळच्या सवयी तुमच वजन वाढवू (weight gain) शकतात, तसेच तुमचे दिवस तणावपूर्ण करू शकतात. त्यामुळे खालील दिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत.

Updated: Feb 6, 2023, 09:52 PM IST
Morning Habits:सकाळच्या 'या' सवयी तुमचं वजन वाढतायत, जाणून घ्या  title=

Bad Habits That Make You Fat : चुकीच्या खाणपाण आणि इतर सवयींमुळे तुमचे वजन वाढत (weight gain)असते. मुळात ही वजन वाढण्याची समस्या दिवाळीनंतर आणखीण वाढते. कारण थंडीत आपण खुप फास्ट फुड खातो. याचा आपल्या वजनावर परिणाम होतो.यासोबत सकाळी उठताना देखील आपण अनेक चुका करत असतो. या चुकांमुळे आपले वजन वाढत असते. या चुका नेमक्या कोणत्या आहेत, ते जाणून घेऊयात. 

सकाळी आलार्म वाजून देखील न उठणे आणि उशिरापर्यंत झोपून राहणे, सकाळी सर्वात आधी कॉफी किंवा चहा पिणे, नाश्ता वगळणे अशा चुका अनेकजण करतात. या सकाळच्या सवयी तुमच वजन वाढवू (weight gain) शकतात, तसेच तुमचे दिवस तणावपूर्ण करू शकतात. त्यामुळे खालील दिलेल्या चुका टाळल्या पाहिजेत. 

उशिरापर्यंत झोपून राहणे

चांगल्या आरोग्यासाठी रोज 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. कमी झोप आणि जास्त झोपल्यानेही वजन वाढू शकते. जर तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर तुम्ही उशीरा नाश्ता कराल, ज्यामुळे तुमच्या चयापचयावर आणखी परिणाम होतो.

सकाळी उठून पाणी न पिणे 

शरीरातील प्रत्येक जैविक क्रियेसाठी पाणी आवश्यक आहे. तुमच्या कोलनमधील कचरा फ्लश करण्यापासून ते सुधारित चयापचय पर्यंत शरीराला अधिक कॅलरी जाळण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात एका ग्लास कोमट पाण्याने करा आणि दिवसभर पुरेसं पाणी प्या जेणेकरून ते चांगले हायड्रेट राहतील.

चुकीचं खाण पाण  

वजन नियंत्रित (weight gain) ठेवण्यासाठी आपल्या नाश्त्यामध्ये योग्य पदार्थ निवडणे खूप महत्वाचे आहे. उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता तुम्हाला वजन कमी करण्यास चालना देऊ शकतो, परंतु आपल्यापैकी बहुतेकांना दररोज सकाळी हे पोषक तत्व पुरेसे मिळत नाही.

व्यायाम न करणे 

सकाळी व्यायाम न केल्याने वजन वाढू (weight gain)शकते. तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करा. चालणे, धावणे, स्किपिंग आणि जॉगिंग करा, यामुळे वजन नियंत्रणात राहिल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)