कोरोनाच्या वॅक्सिनमुळे होतोय Monkeypox? जाणून घ्या काय आहे सत्य!

जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे.

Updated: May 28, 2022, 11:25 AM IST
कोरोनाच्या वॅक्सिनमुळे होतोय Monkeypox? जाणून घ्या काय आहे सत्य! title=

मुंबई : जगात कोरोनाच्या महामारीनंतर आता 'मंकीपॉक्स'च्या संसर्गाने डोकं वर काढलं आहे. हा संसर्ग पसरत असून हा आता चिंतेचा विषय बनलाय. आतापर्यंत किमान 19 देशांमध्ये मंकीपॉक्सच्या प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान यानंतर आता मंकीपॉक्सबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज पसरू लागले. 

अशामध्ये एक गैरसमज लोकांच्या मनात आहे तो म्हणजे, कोरोना लीसमुळे मंकीपॉक्सची लागण होतेय. मात्र हा एक निव्वळ गैरसमज असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर आज जाणून घेऊया मंकीपॉक्सविषयीच्या गैरसमजांबाबत

AstraZeneca च्या कोविड लसीमुळे मंकीपॉक्स होतो का?

ब्रिटनमध्ये अशी अफवा पसरली आहे की, एस्ट्राझेनेका या कोरोना व्हायरस लसीमुळे मंकीपॉक्स पसरतोय. मात्र तज्ज्ञांनी ही केवळ अफवा असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी अशा अफवा पसरवू नयेत, असं आवाहन देखील करण्यात येतेय. 

मंकीपॉक्स केवळ माकडांमार्फत पसरतो

या संसर्गाचा नाव मंकीपॉक्स आहे पण याचा अर्थ हा व्हायरस केवळ फक्त माकडांपासून पसरतो असं नाही. मंकीपॉक्स संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी जवळच्या संपर्कातून व्यक्तींमध्ये पसरतो. कोणत्याही प्राण्याला याची लागण होऊ शकते.

मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होते

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, केवळ मांस खाल्ल्याने मंकीपॉक्सची लागण होत नाही. सोशल मीडियावर मंकीपॉक्सबाबत अनेक पोस्ट केल्या गेल्यात. मात्र तज्ज्ञांनी याला एक गैरसमज म्हटलं आहे. हा व्हायरस संक्रमित प्राण्यांच्या सेवनाने पसरू शकतो. परंतु निरोगी, चांगलं शिजवलेलं मांस खाण्याने व्हायरस पसरत नाही.