मुंबई : आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.
- अपचन किंवा अजीर्ण झाले असल्यास लिंबू यावर खूप उपयुक्त आहे. लिंबू आडवे कापून त्यावर सुंठ किंवा मीठ घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि सातत्याने चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी आदी त्रास कमी होतो.
- पोट दुखत असेल तर आले आणि लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा. त्यामुळे पोटदुखी थांबते.
- उलटीचा त्रास होत असेल तर लिंबू उभे कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास उलटी थांबते. अजीर्ण होत असेल तर लिंबू फार उपयुक्त आहे.
- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते आणि शौचास साफ होते.
- लठ्ठपणा कमी करण्यासाठीही रोज लिंबाचा रस पाण्यातून घेतल्याने खूप फायदा होतो.
- वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच उलटी थांबण्यास मदत होते
- अंगाला खाज सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून चोळावा.