Mahashivratri 2023 : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? मग 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका आणि जाणून घ्या फायदे

Mahashivratri bhang : देशभरात महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतं आहे. आजच्या दिवशी शिव आणि पार्वतीची पूजा करण्यात येते. उपवास ठेवला जातो. याशिवाय आजच्या दिवशी अनेक शिवभक्त भांग पितात. 

Updated: Feb 18, 2023, 09:43 AM IST
Mahashivratri 2023 : आज भांग पिण्याचा प्लॅन आहे? मग 'या' गोष्टी अजिबात खाऊ नका आणि जाणून घ्या फायदे title=
Mahashivratri 2023 bhang benefits and Bhang Side Effects and Do not eat these things after bhang in marathi

Mahashivratri 2023 :  आज देशभरात शिवभक्तांनी मंदिरात गर्दी केली आहे. भोलेनाथ आणि पार्वती यांची पूजाअर्चा आणि अभिषेक करण्यासाठी भक्त मंदिरात जात आहे. आज अनेक ठिकाणी रंगपंचमी आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनेक जण भांग पितात. तुम्ही पण आज भांग पिण्याचा विचार करत असाल तर आधी त्यासोबत कुठल्या गोष्टी खाऊ नयेत. याशिवाय भांग प्यायल्यामुळे खरंच काही फायदा होतो का ते जाणून घ्या. (Mahashivratri 2023 bhang benefits and Bhang Side Effects and Do not eat these things after bhang in marathi)

भांग प्यायल्यामुळे आरोग्यास नुकसान (Bhang Side Effects)

हो भांग प्यायल्यामुळे आरोग्यास नुकसान होऊ शकतं. अनेकांना मळमळ, उलट्या, पचनसंस्थेमध्ये अडथळा, पाहण्याची, ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता कमी होणे, खूप जास्त बडबड करणे. काही काही जणांना डॉक्टरकडे जाण्याची गरज पडते. 

या गोष्टी लक्षात ठेवा (Do not eat these things)

चुकूनही रिकाम्या पोटी भांग खाऊ नका. ती मिल्कशेक किंवा कोणत्याही डिशमध्ये मिसळून खाऊ शकता. 

हृदय आणि दम्याच्या रुग्णांनी भांग घेऊ नये. 

अल्कोहोलमध्ये मिसळून भांग घेऊ नये.

फास्टफूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा. 

सिगारेट आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करु नका. 

संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे खल्ल्याने आरोग्याला हानी होते. 

चहा आणि कॉफीचं सेवन करु नका

पेनकिलरचं सेवन करु नका. 

भांग पिण्याचे फायदे (bhang benefits)

नियमितपणे भांगचं सेवन करणाऱ्यांना तणावापासून दूर नेते. योग्य प्रमाणात भांग घेतल्यास शरीराला आराम मिळतो. 

अनेक अभ्यासातून असंही दिसून आलं आहे, जे लोक नियमित भांग पितात त्यांना मळमळ आणि उलट्या बरं करण्यासाठी फायदेशीर होते. 

भांग पिल्यामुळे आपल्या शरीराची वेदना कमी होते. 

डिप्रेशनने त्रस्त लोकांनी भांग घेतल्यास त्यांचा मूड चांगला होता. 

कर्करोगाशी  लढण्यास मदत होते. कारण भांगमध्ये कॅनॅबिसचा सर्वात मोठा स्त्रोत यातून मिळतो. कॅनॅबिस कर्करोगाशी लढा देण्यासाठी उपयुक्त ठरते, असं एका अभ्यासातून पुढे आलं आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)