गरोदरपणात 'या' महिन्यात शारीरिक संबंध ठेवल्यास होतील 'या' समस्या जाणून घ्या...

कोणत्या महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात असतात. 

Updated: Nov 15, 2022, 12:19 AM IST
गरोदरपणात 'या' महिन्यात शारीरिक संबंध ठेवल्यास होतील 'या' समस्या जाणून घ्या...  title=
Know these problems physical relationship intercourse during this month of pregnancy nz

Pregnancy: गरोदरपणात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. डॉक्टरांपासून ते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळेच वेगवेगळे सल्ले देत असतात. पण काही अशा शंका असतात त्या विचारणे कठीण जात असते. गर्भधारणेदरम्यान लैंगिक संबंधांबद्दल कमी बोलले जाते कारण गर्भवती महिलांना जवळीकांपासून दूर ठेवण्याची प्रथा आहे. अनेक महिलांना प्रेग्नेंसीदरम्यान शारीरिक संबंध करताना खूप अस्वस्थ वाटते. कोणत्या महिन्यात शारीरिक संबंध ठेवणे सुरक्षित आहे किंवा गरोदरपणात शारीरिक संबंध न ठेवण्याचे काही दुष्परिणाम आहेत असे विविध प्रकारचे प्रश्न महिलांच्या मनात असतात. (Know these problems physical relationship intercourse during this month of pregnancy nz)

लिब्रेट वर प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार, तुम्ही आणि तुमचा जोडीदार तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतर अनेक मार्ग निवडू शकता जसे की एकमेकांना प्रेम करणे, मिठी मारणे आणि किस करणे. असे काही जोडीदार आहेत जे गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध करणे हा सर्वोत्तम क्षण मानतात, तर काही असे आहेत जे घाबरतात आणि त्यांच्या स्वतःच्या चिंता असतात.

हे ही वाचा - हिवाळ्यात रात्री त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स फॉलो करा...लगेचच मिळेल रिझल्ट

गरोदरपणात सेक्स करणे टाळले पाहिजे. तरीही जोडप्याची इच्छा असेल तर पोट दाबणे टाळावे. दुसरा त्रैमासिक लैंगिक संबंधांसाठी सुरक्षित असला तरी स्त्रीने त्यात आरामदायी असणे आवश्यक आहे. जर महिलेची गर्भधारणा निरोगी असेल तर जोडीदाराने दुसऱ्या तिमाहीपासून शारीरिक संबंध ठेवण्यास हरकत नाही. याचे कारण असे की गरोदर महिलांच्या गर्भाशयाला सील करणारा जाड म्यूकस प्लग बाळाला कोणत्याही संसर्गापासून वाचवतो.

गरोदरपणात शारीरिक संबंध कधी ठेवू नयेत?

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात शारीरिक संबंध टाळणे चांगले असते अशा परिस्थितींमध्ये प्रामुख्याने गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात काही डाग किंवा रक्तस्त्राव होतो. अशा परिस्थितीत डॉक्टर किमान 14 आठवडे शारीरिक संबंध न ठेवण्याचा सल्ला देतात.

ज्या गर्भवती महिलेला वारंवार पोटदुखी किंवा क्रॅम्प्सचा त्रास होत असेल त्यांनी गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध टाळावेत.

हे ही वाचा - Myths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या

मेयो क्लिनिकच्या मते, गर्भधारणेच्या सहाव्या ते बाराव्या आठवड्यापर्यंत लैंगिक संबंध टाळावेत, कारण त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. गरोदरपणाच्या शेवटच्या दोन महिन्यांत लैंगिक संबंध टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

याशिवाय गरोदरपणाच्या चौथ्या ते सातव्या महिन्यात, तोपर्यंत संभोग करण्याची परवानगी आहे, तरीही आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)