तुम्हाला Mud Therapy म्हणजे काय माहित आहे का? आजच जाणून घ्या

निसर्गोपचार म्हणजेच नैसर्गिक औषधामध्ये मातीच्या पट्टी किंवा मातीच्या पेस्टच्या सहाय्याने बर्‍याच रोगांवर उपचार केला जातो.

Updated: Apr 6, 2022, 03:52 PM IST
तुम्हाला Mud Therapy म्हणजे काय माहित आहे का? आजच जाणून घ्या title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मड थेरपीची जोरदार चर्चा सुरू आहे. मड थेरपी ही फार पूर्वीची थेरेपी आहे. परंतु अद्यापही अनेकांना याबद्दल फारशी माहिती नाहीये. तर आज जाणून घेऊया थेरपी आणि त्याच्या फायद्यांबद्दल.

काय आहे मड थेरेपी?

सोप्या भाषेत, शरीरावर लावण्यात येणाऱ्या मातीच्या लेपाला मड थेरपी म्हणतात. निसर्गोपचार म्हणजेच नैसर्गिक औषधामध्ये मातीच्या पट्टी किंवा मातीच्या पेस्टच्या सहाय्याने बर्‍याच रोगांवर उपचार केला जातो. या थेरपीद्वारे, माती शरीराच्या कोणत्याही भागामध्ये किंवा संपूर्ण शरीरात वापरली जाते. त्वचेशी संबंधित समस्या आणि नैराश्य दूर करण्यासाठी चिखल थेरपी खूप प्रभावी मानली जाते. या मातीची खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे केमिकल फ्री असते.

मातीच्या थेरपीसाठी वापरली जाणारी माती विशिष्ट प्रकारची असते. ही माती सुमारे चार-पाच फूट खालच्या जमीनवरून काढली जाते. मिळालेल्या माहितीनुसार या मातीत एक्टिनोमाइसिटेस नावाचा एक बॅक्टेरिया आढळतो. जे ऋतूनुसार त्याचं स्वरूप बदलतो आणि जेव्हा तो पाण्यामध्ये मिसळतो तेव्हा त्यात बरेच बदल होतात. 

मड थेरपी त्वचेच्या समस्या दूर करते

मड बाथ थेरपी घेतल्यास त्वचेसंदर्भातील समस्या दूर करता येतात. त्यामध्ये सुरकुत्या, मुरुम, त्वचेचा कोरडेपणा, पांढरे डाग, सोरायसिस आणि एक्जिमा या समस्या दूर होण्यास मदत होते. यासह, मड थेरपी घेतल्यास त्वचा चमकदार बनते आणि त्वचा मऊ होते.

मड थेरेपीचे इतर फायदे

मड बाथ थेरेपीद्वारे पचनशक्ती सुधारते. त्याचशिवाय आतड्यांची उष्णता दूर होते. शिवाय अतिसार आणि उलट्यांचा त्रास दूर होतो. बद्धकोष्ठता, फॅटी लिव्हप, दमा, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि नैराश्यासारख्या समस्या त्रास कमी होण्यास फायदेशीर असल्याचा दावा करण्यात येतो.