मुंबई : मल्टिपल स्क्लेरॉसिस हा असा विकार आहे ज्यामुळे व्यक्तीच्या मेंदूवर आणि पाठीच्या कण्यावर परिणाम होतो. एखादी व्यक्ती जनुकीय दृष्टया नाजूक असल्यास आणि जीवनसत्वांचे प्रमाण कमी असल्यास, विषाणू आणि पर्यावरणीय घटकांमुळे हा विकार जडू शकतो. या विकारामुळे मज्जातंतूंभोवती असलेल्या संरक्षक कवचावर परिणाम होतो. परिणामी मज्जासंस्था शरीराला संदेश पाठविण्याचे कार्य करू शकत नाही. डॉ. महाजन हॉस्पिटलचे रिजनरेटिव्ह मेडिकल एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिली.
थकवा येणे, दृष्टी दोष, मुंग्या यणे अथवा बधीर होणे, उंच ठिकाणाची भिती वाटणे, चक्कर येणे, स्नायू अशक्त होणे आणि गोळे येणे, तोल आणि समन्वयाशी निगडीत समस्या ही मल्टिपल स्क्लेरॉसिसची लक्षणे आहेत. अस्पष्ट उच्चार, गिळताना येणाया समस्या, आकलनक्षमतेवर परिणाम, चालताना त्रास होणे, मलमूत्रविसर्जनाच्या समस्या, स्वभावातील चढउतार किंवा नैराश्य ही लक्षणेसुद्धा आढळतात.
मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णावर बहुधा इम्युन-सप्रेसिव्ह औषधे आणि मोनोक्लोनल अँटिबॉडीजनी उपचार करण्यात येतात. पण ही औषधे जास्त कालावधीसाठी वापरली असता साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि यामुळे लक्षणांवर पूर्ण उपचार होत नाहीत.
सेल्युलर थेरपीचा वापर करून, स्टेम सेलच्या विविध गुणधर्माचा वापर करून मल्टिपल स्क्लेरॉसिसवर पूर्ण उपचार करता येऊ शकतात. ऑटोलॉगस पेशीवर आधारित थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वत:च्या शरीरातील स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण करण्यात येते, ज्याने प्रतिकारक क्षमता पुनस्र्थापित होते.
ऑटोलॉगस स्टेम सेल या न्यूरोप्रोटेक्टिव्ह असतात आणि त्यात पॅराक्राईन गुणधर्मसुद्धा असतात, ज्यामुळे मल्टिपल स्क्लेरॉसिस असलेल्या रुग्णांना लाभ होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्टेमसेलमध्ये असलेल्या प्रतिकारक्षमता व्यवस्थापनाच्या गुणधर्मामुळे मल्टिपल स्क्लेरॉसिस झालेल्या रुग्णांच्या केंद्रीय चेतासंस्थेला झालेले नुकसान कमी होण्यास मदत होते.
त्याचप्रमाणे अपाय झालेल्या मज्जातंतूची पुनर्निर्मिती करण्यास मदत करतात. रुग्णांना बरे होण्यास लागणारा कालावधी २ महिन्यांपासून ते १ वर्षापर्यंतचा असू शकतो. स्टेमसेल शरीरात कार्यरत करण्यासाठी विविध मार्ग आहेत, रुग्णाची परिस्थिती आणि आवश्यकता यावर हा मार्ग अवलंबून असतो. चेतासंस्थेच्या विकारामध्ये ज्या मार्गाने पेशी मेंदूपर्यंत पोहोचविता येऊ शकतात, तो मार्ग योग्य मार्ग असतो.
मल्टीपल स्क्लेरॉसिस सारख्या विकाराला रोखता येत नाही परंतु वेळीच निदान त्याची तीव्रता नक्कीच कमी करू शकते. प्रतिबंधक उपायांमध्ये जीवनशैलीच अचूक बदल, समतोल आहाराचे सेव आणि मद्यपान,तंबाखू आदी व्यसनांपासून दूर राहणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, योगसाधना करणे जेणेकरून तणावापासूनदूर राहणे शक्य होईल.