10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल

ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 28, 2024, 07:14 PM IST
10 रुपयाच्या भाजीचा ज्यूस शरीरातील युरिक ऍसिड खेचून काढेल  title=

High Uric Acid Level Remedies: शरीरातील यूरिक ॲसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेव्हा शरीरात प्युरीनची पातळी वाढते, तेव्हा ते तुमच्या शरीरात यूरिक ॲसिड तयार होते. हे युरिक ॲसिड पायाच्या बोटांमध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे पायाच्या बोटांमध्ये ढेकूळ निर्माण होऊन रुग्णाला तीव्र वेदना होऊ लागतात. ही सूज आणि वेदना इतकी तीव्र आहे की लोकांना सामान्यपणे चालणे आणि बूट घालणे देखील कठीण होऊ शकते.

खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात प्युरीनची पातळी वाढू लागते. त्याच वेळी, काही खाद्यपदार्थांच्या मदतीने ते कमी केले जाऊ शकते. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या शरीरातील प्युरीन वाढवणारे कोणतेही पदार्थ सेवन करू नये. शरीरातील यूरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही दुधीच्या भाजीचा रस पिऊ शकता. हे प्युरिनची पातळी कमी करण्यास आणि यूरिक ऍसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यूरिक ऍसिडची पातळी कमी करण्यासाठी दुधीचे सेवन कसे केले जाऊ शकते ते जाणून घेऊया.

युरिक ऍसिड कमी करण्यासाठी?

दिवसातून एकदा दुधीची ज्यूस पिऊ शकता. यासाठी जिरे आणि मीठ टाकून दुधीची ज्यूस अगदी कमी मसाल्यात शिजवून घ्यावी. ही साधी भाजी खाल्ल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहील आणि युरिक ॲसिडची पातळीही कमी होईल.

दुधीचा रस प्या

एक ताजी दुधी घ्या आणि त्याची साल काढा आणि त्याचे लहान तुकडे करा.
मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या.
आता ते गाळून घ्या आणि दुधीच्या रसात चवीनुसार पांढरे मीठ किंवा काळे मीठ टाका.
हा रस सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. नेहमी ताजा रस बनवून लगेच प्या.
या सर्वांशिवाय तुम्ही दुधीचा रायता किंवा दुधीची खीर बनवून खाऊ शकता.