जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल

Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ..

Updated: Nov 27, 2021, 09:15 AM IST
जर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल title=

मुंबई : Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी  (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने तुम्ही आजारी देखील पडू शकता. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी (Jeera Water) सेवन करत असाल तर त्याचे प्रमाण लक्षात ठेवा. जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन केल्याने तुम्ही आजारी पडू शकता. वजन कमी करण्यापासून ते कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यापर्यंत जिऱ्याचे पाणी (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जाचो, परंतु जर तुम्हाला रक्तातील साखर (blood sugar), मूत्रपिंड किंवा यकृताशी संबंधित काही समस्या असतील तर जिरे पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवा.

पचनक्रियेसह समस्या

जिऱ्याचे पाणी (Jeera Water) जास्त प्रमाणात प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करा. काहीवेळा यामुळे पोटात गॅस तयार होण्याची समस्या वाढते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.

मूत्रपिंड आणि यकृतवर प्रभाव

जिऱ्याचे पाणी (Jeera Water) जास्त प्रमाणात प्यायल्याने मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होतो. जर तुम्हाला आधीच किडनी किंवा लिव्हरशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर आहार तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच जिऱ्याच्या पाण्याचे (Jeera Water) सेवन करा.

रक्तातील साखर खूप कमी होईल

रक्तातील साखर कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी (Jeera Water) वापरण्याचा सल्ला दिला जातो, परंतु जर तुमची रक्तातील साखर नियंत्रणात असेल तर ते मर्यादित प्रमाणात सेवन करा. मोठ्या प्रमाणात जिरे पाणी (Jeera Water) रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येऊ शकते.

गरोदर महिलांसाठी

गरोदर महिलांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय जिऱ्याचे पाणी (Jeera Water) सेवन करू नये. जिऱ्याचे पाणी जास्त प्यायल्याने गर्भपात होण्याचा धोका असतो. त्याचा प्रभाव गरम आहे, ज्यामुळे गर्भपात होऊ शकतो. मासिक पाळीत जिऱ्याचे पाणी प्यायल्याने रक्तस्त्राव वाढू शकतो.

स्तनपान करणाऱ्या महिलांनी जिऱ्याचे पाणी जास्त प्रमाणात सेवन करू नये. त्यामुळे दुधाची कमतरता भासू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ते प्या.

मळमळ आणि मेंदूची समस्या

जिऱ्याच्या पाण्यात (Jeera Water) अंमली पदार्थ आढळतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मळमळ आणि मेंदूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)