जाणून घ्या फणसाचे ५ महत्त्वाचे फायदे

नियमित फळं खाणं आरोग्यासाठी लाभदायक आहे.    

Updated: Feb 16, 2021, 03:45 PM IST
जाणून घ्या फणसाचे ५ महत्त्वाचे फायदे title=

मुंबई : आताच्या धकाधकीच्या जीवनात सकस अहारासोबतच फळं देखील शरीरासाठी फार लाभदायक असतात. सध्या फणसाचा हंगाम आहे. त्यामुळे बाजारात फणस उपलब्ध आहेत. फणस हे असं फळ किंवा अशी भाजी आहेत ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊ

१. फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमीन ए, सी, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, लोह यांचा फणसात मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

२. पिकलेल्या फणसाचा पल्प करुन तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.

३. फणसात मोठ्या प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.

४. भरपूर प्रमाणात लोह असल्याने ऍनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

५. थायरॉइडचा त्रास असणाऱ्या लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.