मुंबई : पावसाळा नुकताच सुरू झालाय. ऋतुचर्येप्रमाणे आहाराचं नियोजन असावं असं आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. त्यानुसार पावसाळ्यातही आहाराचे विशिष्ट नियोजन असावं. या काळात आपली पचनक्रिया मंदावत असल्यानं तसंच रोगप्रतिकारशक्तीही कमी असल्यानं आहाराचं योग्य नियोजन असायला हवं.
पावसाळाच्या काळात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या पाण्यामुळं होणार्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला पडसं यासारखे आजार जडतात. दूषित पाण्यामुळं कावीळ, लेप्टोस्पायरोसिस यासारखेही विकार जडतात. योग्य आहाराचं नियोजन केल्यास हे आजार आपण निश्चितच टाळू शकतो.