मुंबई : बदलत्या लाईफस्टाईलमुळे चुकीचा आहारामुळे मधुमेही रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. यामुळे मधुमेही रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवर विशेष लक्ष द्यावं लागतं. मधुमेही रूग्णांच्या मनात खाण्या-पिण्याच्या सवयीबाबत अनेक प्रश्न असतात. यामधील एक प्रश्न म्हणजे मधुमेही रूग्णांनी पीनट बटर खावा का?
अनेक रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, मधुमेही रूग्ण पीनट बटर खाऊ शकतात. पीनट बटरच्या सेवनाने कोणतंही नुकसान होत नाही. मात्र Peanut Butter खाताना तुम्हाला ते प्रमाणात खाल्लं पाहिजे. कारण अधिक प्रमाणात याचं सेवन केल्याने तुमची तब्येत बिघडू शकते.
पीनट बटरमध्ये असलेले गुण ब्लड शुगरचा स्तर कंट्रोल करण्यासाठी उपयुक्त मानले जातात. यामुळे मधुमेही रूग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, पीनट बटरचं सेवन करावं.
पीनट बटर हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं. यामध्ये पी-कॉमरिक नावाचं एसिड असतं. जे हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी पीनट बटरचं सेवन फायदेशीर आहे. असं मानलं जातं की, टाईप -2 मधुमेहाचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो