मुंबई : बऱ्याच वेळा सामान्य वाटणारी पाठदुखी ही स्पॉँडीलायटीस असू शकते.
अलिकडच्या काळात तरुणांमध्ये विशीत आणि तिशीतच पाठदुखीचं प्रमाण वाढलं आहे. बऱ्याचवेळा याच्याकडे किरकोळ दुखणं समजून दुर्लक्ष केलं जातं. परंतु ही साधीसुधी पाठदुखीऐवजी स्पॉँडीलायटीस असू शकते.
स्पॉँडीलायटीसमध्ये मणके, सांधे याठिकाणी सतत वेदना होत असतात. अनेकवेळा मान आणि पाठ जिथे सांधले जातात तिथे खूप वेदना होत असतात. याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार बदलती जीवनशैली, बसण्या उठण्याच्या चूकाच्या पद्धती, कामाचा ताण ही स्पॉँडीलायटीसची कारणं आहेत. भारतीय तरुणांमध्ये याचं प्रमाण सातत्याने वाढत चाललय. ही अनेक तज्ञांना चिंतेची बाब वाटते.