मासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं

...आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू लागतात.

Updated: Aug 5, 2022, 01:54 PM IST
मासिक पाळीदरम्यान होतेय चिडचीड? दुर्लक्ष करु नका, असू शकतात मोठ्या आजाराची लक्षणं title=

problems of periods: मासिक पाळीदरम्यान स्ञीच्या शरीरात बरेच बदल घडत असतात हार्मोनल्स चेंजेसमुळे अनेक बदलांना सामोरं जावं लागतं परिणामी पोटदुखी,चिडचिडेपणा मूडस स्विंग्ससारख्या समस्यांना समोरं जावं लागतं बऱ्याचदा या हार्मोनल चेंजेसचा गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतो.परियड्स दरम्यान शरीरावर पिंपल्स येणं किंवा शरीरावर रॅशेसची समस्या होऊ शकते.जर तुम्हालासुद्धा सतत यासारख्या समस्यांना समोर जावं लागत असेल तर ही बातमी तुम्ही पूर्ण वाचलीच पाहिजे. खरतर यारख्या समस्यांनी पीडित असाल तर महिला रोग तज्ज्ञांना दाखवणं खूप गरजेचं आहे  कारण अशाच काही प्रकारात काहींना ऑटोइम्यून प्रोजेस्टेरोन डर्मेटाइटिस देखील असू शकतो 
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पिंपल्स येणं किंवा रॅशेस येणं हे सामान्य आहे मात्र जर केवळ परियड्स दरम्यानच तुम्हाला जर रॅशेस किंवा पिंपल्स येत असतील आणि पिरियड्स संपल्यावर जात असतील तर मात्र ही गंभीर बाब असू शकते याकडे दुर्लक्ष करू नका.  

प्रोजेस्टेरोन हार्मोनचा स्तर असंतुलित झाला असेल ? 

महिलांच्या शरीरात विशेष हार्मोन्स असतात जे मासिक पाळीच्या चक्राला सुरळीत ठेवण्याचं कार्य करतात त्याचसोबत गर्भधारणा करण्याससुद्धा मदत करतात प्रोजेस्टरोन एक असा हार्मोन आहे ज्याचं मुख्य कार्य मासिक पाळीला नियमित आणि सुरळीत ठेवण्याचं काम करतो अंडाशयातून या हार्मोनची निर्मिती होते काही कारणास्तव जर प्रोजेस्टरोन हार्मोनमध्ये काही असंतुलन झालं असेल तर याचा थेट परिणाम मासिक पाळीवर होतो आणि वेळेआधी मोनोपॉज येऊ शकतो इतकंच काय तर गर्भधारणेवर देखील याचा गंभीर परिणाम होऊ शकतो 

ऑटोइम्यून प्रोजेस्टेरोन डर्मेटाइटिस

काही महिलांमध्ये पिरियड्स दरम्यान पोट दुखी,चिडचिडेपणा ,मुड स्विंग्ससारख्या समस्या उदभवतात त्याच सोबत  रॅशेस ची समस्या येऊ लागते ऑटोइम्यून प्रोजेस्टेरोन डर्मेटाइटिसमुले हे होण्याची शक्यता असते ज्यांना ही समस्या असते.त्या स्त्रीयांमध्ये मासिक पाळी येण्याच्या २-३ दिवस आधीपासून पिंपल्स यायला सुरवात होते आणि मासिक पाळीचं चक्र संपल्यानंतर २-३ दिवसात ते ठीक होऊ लागतं. असं यासाठी होत जेव्हा प्रोजेस्टरोन चा स्तर वाढु लागतो.

नक्की ही समस्या आहे तरी काय ?

अजून तरी काही ठोस कारण सापडू शकलं नाहीये की ज्यामुळे ऑटोइम्यून प्रोजेस्टेरोन डर्मेटाइटिसची समस्या उदभवते काही अभ्यासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही महिलांचं शरीर अशा प्रकारच्या हार्मोन्स उत्सर्जित झाल्यावर जास्त ऍक्टिव्ह होत किंवा हि एक प्रकारची ऑटो इम्युनन प्रकिया असू शकते आणि काही वेळा हार्मोन्स बिघडल्यामुळे होणारी अ‍ॅलर्जीसुद्धा असू शकते या सर्व कारणांमुळे ही लक्षण दिसू  लागतात.  

दुर्लक्ष करू नका 

तुम्हाला सुद्धा यापैकी कुठलंही लक्षण जाणवत असेल तर याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि औषध उपचार घ्या ज्यामुळे कुठली मोठी गंभीर समस्या होणार नाही.