मुंबई : निरोगी राहण्यासाठी चांगला आहार घेणे आणि चांगली झोप आवश्यक आहे. सध्या लोकांची जीवनशैली इतकी अनियंत्रित झाली आहे की खाण्याची किंवा झोपण्याची त्यांची ठरावीक वेळ नाही. काही लोक वेळेवर काम करण्याचा प्रयत्न करताता परंतु त्यांना नीट झोप येत नाही. ते रात्रभर जागे राहताता ज्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांचे डोके जड असल्याचे त्यांना जाणवते आणि शरीरत थकवा देखील जाणवतो.
लोक साधारणपणे ही लक्षणे हलक्यात घेतात. बहुतेक लोकांना वाटते की, ही एक साधी समस्या आहे आणि जर जीवनशैली योग्य असेल तर ती निश्चित केली जाईल. परंतु तज्ज्ञांनी सल्ला दिला की, या लक्षणांना हलक्यात घेऊ नये. याचे कारण तुम्हाला स्लीप एपनिया (OSA) ची लक्षणे असू शकतात.
'डेंटल स्लीप मेडिसिन' परिषदेदरम्यान असे सांगितले गेले आहे की, भारतातील सुमारे 4 दशलक्ष लोक ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) सिंड्रोमने ग्रस्त आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की विशेषतः लठ्ठ लोक आणि वृद्ध लोक याचा बळी पडले आहेत. श्वासोच्छवासामुळे रात्री वारंवार झोप न येणे हा गंभीर रोग असू शकतो.
स्लीप एपनिया म्हणजे असा आजार ज्यात रुग्णा झोपताना अचानक त्याचा श्वास थांबतो आणि अचानक जाग येते. हा एक झोपेशी संबंधित रोग आहे, परंतु आपल्यापैकी बहुते लोकांना याची जाणीव नसते.
एका घोरणाऱ्याला ज्याप्रमाणे झोपेत हे कळत नाही की तो घोरतोय, त्याच प्रकारे स्लीप एपनियाच्या रुग्णाला हे देखील कळत नाही की त्याचा झोपताना श्वास थांबला होता. कधीकधी झोपेत श्वासोच्छवासाची समस्या काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकू शकते.
या रोगावर श्वसन चिकित्साद्वारे म्हणजे CPAP Machine मशीनद्वारे उपचार केला जातो. परंतु दंतचिकित्स म्हणजे डेंटिस्ट देखील मदत करु शकतात. डॉयश वेले दंतचिकित्सा तज्ज्ञांच्या हवाल्यात असे सांगण्यात आले आहे की, या स्थितीवर मॅन्डिब्युलर अॅडव्हान्समेंट उपकरणांद्वारे उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये जबडा आणि जीभ तात्पुरती पुढे सरकवली जाते. त्याच वेळी, ते घशात वायुमार्गाची जागा वाढवते.