सकाळी गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर सावधान...

कदाचित तुमची चुकीची अंघोळीची पद्धत सकाळी थकल्यासारखं वाटण्यास कारणीभूत ठरू शकते. 

Updated: Jun 22, 2021, 02:50 PM IST
सकाळी गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर सावधान... title=

मुंबई : तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर थकल्यासारखं वाटतं...तसंच सतत झोप येतेय असं फिलींग येतं...मग यासाठी कदाचित तुमची चुकीची अंघोळीची पद्धत कारणीभूत ठरू शकते. दरम्यान आपल्या देशात बहुतांश लोकं सकाळी गरम पाण्याने अंघोळ करणं पसंत करतात. यामुळे तुम्हाला रिलॅक्सही वाटतं. मात्र तुमच्या येणाऱ्या थकव्याला हीच गोष्टी कारणीभूत ठरू शकते.

गरम पाण्याने आंघोळ केल्यावर तुम्ही सामान्य किंवा थंड तापमानात येताच शरीराचं तापमानात अचानक खालावतं. यामुळे शरीर अधिक आरामदायी स्थितीत येते. अशा परिस्थितीत आपल्याला झोप किंवा थकवा जाणवतो. ही गोष्ट टाळण्यासाठी, आंघोळ करण्याचा योग्य मार्ग माहित असणं आवश्यक आहे.

जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत 

गरम शॉवर घेतल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वी आपल्या 30 सेकंदासाठी थंड पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर पुन्हा गरम पाणी घाला. तापमानात होणारा बदल त्वचेखालील पातळ रक्त वाहून नेणारे केशिकांना आतून उघडतो, ज्यामुळे शरीरात रक्ताचा प्रवाह वाढतो. यामुळे शरीराला उर्जा मिळते.

'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका संशोधनातून असं दिसून आलं आहे की, आंघोळ करण्याची ही पद्धत तणावाची क्षमता कमी करते. तसंच, रोगप्रतिकारक क्षमता सुधारण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे.