पहिल्यांदाच जीमला जाताय? मग या गोष्टी जरूर पाळा

नव्याने किंवा पहिल्यांदा जीम करण्याचा विचार करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.

Updated: Apr 10, 2022, 08:23 AM IST
पहिल्यांदाच जीमला जाताय? मग या गोष्टी जरूर पाळा title=

मुंबई : उन्हाळा आला की, आपल्यापैकी बहुतेक जण व्यायाम करण्यासंदर्भात निर्णय घेतात. कदाचित तुम्ही देखील असा काही निर्णय घेतला असेल. कारण गेल्या 2 वर्षांमध्ये लॉकडाऊनमुळे अनेकांच्या वजनात वाढ झाली आहे. जर तुम्हीही असा निर्णय घेतला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण नव्याने किंवा पहिल्यांदा जीम करण्याचा विचार करताना काही गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.

तुम्ही जीम का करताय हे लक्षात ठेवा

  • दुसऱ्यांना पाहून जीमला जायला सुरुवात करू नका
  • तुमचं आरोग्य जपण्यासाठी जिममध्ये जा.
  • एखाद्याला दाखवण्यासाठी जिममध्ये जाऊ नका.
  • जर कोणी तुमच्यापेक्षा जास्त वजन उचलत असेल तर तुम्ही त्याचं अनुकरण करू नका.
  • जिमला जाण्यापूर्वी तुमचा अहंकार बाहेर सोडा.

व्यायाम करताना कोणत्या चुका टाळाव्यात?

  • जीममध्ये जाताना आपण अधिकाधिक वजन उचललं पाहिजे असं आपल्याला वाटतं. मात्र असं करू नका
  • चुकीचा व्यायाम केला तर दुखापत होऊ शकते ही गोष्ट ध्यानात ठेवा.

जीमच्या आधी आणि नंतर कोणत्या गोष्टी कराव्यात?

  • सर्व प्रथम आपल्या आहाराकडे लक्ष द्या.
  • जिमच्या आधी चांगला आहार करा. यामध्ये प्रथिनं, कार्बोहायड्रेटचा समावेश करा.
  • जीमला जाण्यापूर्वी 1-2 तास आधी खा.
  • जीमला जाण्यापूर्वी पाणी प्या. 
  • जिममध्ये गेल्यावर आधी वॉर्म अप करा.
  • आपल्याला कोणताही व्यायाम करायचा असेल तर त्याची सुरुवात हलक्या वजनाने करा.