हाडांचा अक्षरशः सापळा झालाय? ICMR ने सांगितले 10 Calcium Rich Foods

Calcium Foods : शरीरात कॅल्शियमची कमतरता तुमचं शरीर आतून पोखरुन टाकतं. अशावेळी नैसर्गिक पदार्थांनी कॅल्शियमची पोकळी भरून टाकू शकता. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jun 5, 2024, 03:44 PM IST
हाडांचा अक्षरशः सापळा झालाय? ICMR ने सांगितले 10 Calcium Rich Foods  title=

शरीराला आवश्यक असलेल्या पोषकतत्त्वांमध्ये कॅल्शियम देखील तितकेच महत्त्वाचे ठरतात. हाडांमध्ये आणि दातांमध्ये ताकद भरण्यासाठी शरीरात कॅल्शियमची नितांता आवश्यकता असते. याची कमतरता तुमचे आरोग्य धोक्यात टाकू शकते. यामुळे शरीरात कॅल्शियमची आवश्यकता महत्त्वाची असते. अनेकदा यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका निर्माण होतो. अशावेळी शरीरात कॅल्शियमची पातळी वाढवण्यासाठी काय करावे? हा प्रश्न पडतो. अशावेळी ICMR च्या रिपोर्टनुसार जाणून घ्या 10 कॅल्शियम रिच फूड्स 

सुकी मच्छी 

पावसाळ्यात समुद्रातील मासेमारी बंद असते. अनेक कुटुंबात अशावेळी आहारात सुक्या मच्छीचा समावेश केला जातो. या सुक्या मच्छीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्याचे सांगण्यात येते. ICMR च्या मते, सर्वाधिक कॅल्शियम सुक्या माशांमध्ये आढळते. 100 ग्रॅम सुक्या माशांमध्ये 1962.6 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. यानंतर, दुग्धजन्य पदार्थांमध्ये 755 मिलीग्राम कॅल्शियम, 367.2 मिलीग्राम कोरड्या मसाल्यांमध्ये, 323.1 मिलीग्राम मासे आणि कोणत्याही सीफूडमध्ये, 279.3 मिलीग्राम हिरव्या पालेभाज्यांमध्ये आणि 211.6 मिलीग्राम काजूमध्ये आढळते. डाळी, दूध, अंडी आणि बाजरी हे देखील कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत.

कॅल्शियमचे इतर स्त्रोत 

दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, चीज, दही आणि ताक
हिरव्या पालेभाज्या: पालक, मेथी, मोहरीच्या हिरव्या भाज्या, कोथिंबीर
सोया उत्पादने: टोफू, सोयाबीन, सोया दूध
सुकामेवा: बदाम, अक्रोड, तीळ, खसखस
फळे: अंजीर, वाळलेल्या जर्दाळू, संत्री
मासे: सार्डिन, सॅल्मन

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे 

  • हाडे कमकुवत होणे आणि ऑस्टियोपोरोसिस
  • स्नायू पेटके आणि वेदना
  • थकवा आणि अशक्तपणा
  • अनियमित हृदयाचा ठोका
  • नैराश्य
  • केस गळणे आणि नखे तुटणे

कोणत्या वयात किती कॅल्शियमची आवश्यकता 

  • शिशु (6 महिने ते 1 वर्ष): 400 मिग्रॅ
  • मुले (1-3 वर्षे): 600 मिग्रॅ
  • मुले (4-8 वर्षे): 800 मिग्रॅ
  • मुले आणि मुली (9-18 वर्षे): 1200 मिग्रॅ
  • पुरुष (19-50 वर्षे): 800 मिग्रॅ
  • महिला (19-50 वर्षे): 800 मिग्रॅ
  • गर्भवती आणि स्तनपान करणारी महिला: 1000 मिग्रॅ
  • पुरुष (51 वर्षे आणि त्याहून अधिक): 800 मिग्रॅ
  • महिला (51 वर्षे आणि त्याहून अधिक): 1200 मिग्रॅ

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)