तुम्हीही त्रस्त आहात किचनमध्ये येणाऱ्या झुरळांमुळे. हा उपाय एकदा करा...झुरळं किचनमध्ये फिरकणार सुद्धा नाहीत

घरात फक्त झुरळचं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कीटकांमुळे त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील

Updated: Jul 23, 2022, 02:42 PM IST
तुम्हीही त्रस्त आहात किचनमध्ये येणाऱ्या झुरळांमुळे. हा उपाय एकदा करा...झुरळं किचनमध्ये फिरकणार सुद्धा नाहीत  title=

मुंबई:  जर तुम्ही घरात झुरळांच्या वाढत्या संख्येने हैराण असाल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. विशेष म्हणजे या उपायांनी घरामध्ये झुरळं तर दिसणार नाहीतच, पण या उपायांनी तुम्हाला कोणतीही हानीही होणार नाही. 

घरात फक्त झुरळचं नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कीटकांमुळे त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरतील. झुरळांमुळे घरात घाण तर पसरतेच शिवाय अन्नातून विषबाधा होण्याचाही धोका असतो. अन्नपदार्थांवरील त्यांच्या विष्ठेमुळे अनेक आजार आणि ऍलर्जी होतात.  चला तर मग जाणून घेऊया त्यांना घराबाहेर काढण्याचे कोणते उपाय आहेत.

कडुनिंब 

कडुनिंबाची पानं किंवा त्याचं तेल दोन्ही कीटक मारण्यासाठी प्रभावी आहेत. कडुनिंबाची पानं बारीक करून गाळून पाण्यात मिसळून झुरळ किंवा कीटकांवर फवारणी करावी.  जर तुमच्याकडे कडुनिंबाची पानं नसतील तर तुम्ही कडुनिंबाचं तेल देखील फवारू शकता.

तमालपत्र

झुरळं दूर करण्यासाठी तमालपत्र देखील खूप प्रभावी आहे.  र हिरवी पाने असतील तर त्यांना बारीक करून स्प्रे बनवा आणि जर कोरडी पाने असतील तर ते उकळवून स्प्रे बाटलीत ठेवा. यानंतर झुरळांच्या जागेवर शिंपडा.

काळी मिरी, कांदा आणि लसूण

काळी मिरी, कांदा आणि लसूण यांची पेस्ट तयार करा आणि पाण्यात मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा. त्यानंतर ते झुरळावर शिंपडा.  यामुळे झुरळं मारली जातील.

 

बेकिंग सोडा  

बेकिंग सोडा प्रत्येक घरात असतो आणि तो झुरळांचा शत्रू आहे हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल.  फक्त बेकिंग सोडा साखरेत मिसळा आणि स्प्रे बाटलीत ठेवा आणि झुरळं दिसतील तिथे फवारणी करा