रक्तदाब नियमित राहण्यासाठी या गोष्टी आहारात असाव्यात

दगदगीच्या आणि नियमित येणाऱ्या ताणामुळे खूप लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त झाले आहेत. रक्तदाबाच्या रुग्णाला जेवणात मीठाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले जाते.

Updated: Jun 24, 2019, 09:06 PM IST
रक्तदाब नियमित राहण्यासाठी या गोष्टी आहारात असाव्यात title=

मुंबई : दगदगीच्या आणि नियमित येणाऱ्या ताणामुळे खूप लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त झाले आहेत. रक्तदाबाच्या रुग्णाला जेवणात मीठाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले जाते. अनेक लोक रक्तदाबाच्या औषधांवर अवलंबून असतात. मीठ आणि औषधांच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आहारात थोडा बदल केल्यास रक्तदाब कंट्रोल करू शकतात.

काही गोष्टी नियमित तुमच्या स्वयंपाक घरात येतात, पण तुम्ही त्यावर कधी लक्ष दिले नाही. तुम्ही त्याचे सेवन केले असेल परंतू, तुम्हाला त्याचे रक्तदाबावरचे फायदे माहित नाही. खाण्याच्या या गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही रक्तदाब कमी करू शकतात. 

खालील गोष्टींचा आहारात समावेश केल्यास रक्तदाब कमी करू शकतात. 

पालेभाज्या
पालेभाज्या रक्तदाब रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. पोटॅशिमन युक्त असलेल्या या भाज्या शरिरातील सोडीयम कमी करतात आणि रक्तदाब कंट्रोलमध्ये करण्यात मदत करतात. कोबी, पालक आणि अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्या फायदेशीर आहेत.

साय रहीत दूध
साय रहीत दुधात अतिप्रमाणात कॅलशियम आणि विटामिन-डी असतात. संशोधकांप्रमाणे या दोन्ही गोष्टींमुळे १० टक्के रक्तदाब कमी होऊ शकतो.

बीटचा रस
रोज एक ग्लास बीटचा रस रक्तदाब कंट्रोल करण्यात मदत करतो. रिपोर्टनुसार त्यातले नाइट्रेट नाइट्रिक ऑक्साइडमध्ये बदलून रक्तवाहिन्यात पसरून देतात. त्यामुळे रक्तदाब नियमित होण्यास मदत होते.

डाळिंब
माहिती नुसार प्रत्येक दिवशी डाळिंबाचा एक ग्लास रस पिल्याने लवकर रक्तदाब कंट्रोल करु शकतात.

केळी
केळी पोटॅशियम युक्त आहे. पोटॅशियम रक्तदाब कमी करण्याच काम करते. केळीला दुधासोबत रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतं.