'हे' केमिकल फ्री उपाय डासांना ठेवतील घरापासून दूर !

पावसाचे दिवस सुरू झाले की आजारपणदेखील डोकं वर काढायला सुरूवात करतात.

Updated: Jul 15, 2018, 03:23 PM IST
'हे' केमिकल फ्री उपाय डासांना ठेवतील घरापासून दूर !  title=

मुंबई : पावसाचे दिवस सुरू झाले की आजारपणदेखील डोकं वर काढायला सुरूवात करतात. या दिवसात साथीचे आजार अधिक झपाट्याने पसरतात. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घरात किंवा आजुबाजूच्या परिसरात डेंग्यूच्या अळ्या सापडणं हे आरोग्याला धोकादायक आहे. सोबत यामुळे प्रशासन तुमच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करू शकते. म्हणूनच घराजवळ डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या. डास घरातून पळवून लावण्यासाठी या नैसर्गिक उपायांची तुम्हांला मदत होऊ शकते. 

कडुलिंब -

इंफेक्शन दूर करण्याची सर्वात मोठी क्षमता कडुलिंबामध्ये आहे. यासोबतच कडुलिंब डासांना दूर करण्यासाठीदेखील मदत करतो. कडुलिंब आणि नारळाचे तेल समप्रमाणात मिसळून शरीरावर रगडा. यामुळे किमान आठ तास तुमचं डासांपासून रक्षण होऊ शकते. 

कापूर -  

डासांपासून रक्षण होण्यासाठी तुम्ही केमिकलयुक्त कॉईलचा वापर करत असाल तर त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ शकतो. मग अशा कॉईलपेक्षा घरात काही कापूर 15-20 मिनिटं जाळा. यामुळे घरात कापराचा मंद सुगंध पसरेल सोबतच डासांना पळवण्याचाही हा नामी उपाय आहे. 

लिंबू -  

लिंबू आणि निलगिरीचं तेल समप्रमाणात मिसळा. हे मिश्रण शरीरभर लावा. या तेलाच्या वासाने डास दूर राहण्यास मदत होते. 

तुळस - 

तुळशीचे रोप घराच्या खिडकीवर, बाल्कनीमध्ये ठेवा. यामुळे डास दूर जाण्यास मदत होते. तुळशीप्रमाणेच लिंबू, झेंडू ही झाडं डासांना घरात प्रवेश करण्यापासून रोखतात.  डासांंना दूर ठेवण्यासाठी घरच्या घरी बनवा केमिकल फ्री mosquito-repellent Oil

लसूण -  

लसणाच्या उग्र वासामुळेदेखील डास दूर जाण्यास मदत होते. पाण्यात लसणाच्या पाकळ्या ठेचून उकळा. हे पाणी घरात शिंपडा. यामुळे डास घरापासून दूर राहण्यास मदत होते.  

लॅव्हेंडर -  

लॅव्हेंडरचा वासदेखील डासांना दूर ठेवण्यासाठी मदत करतात. घरात लॅव्हेंडरचा रूम फ्रेशनर्स मारल्यानेदेखील डास घरापासून दूर राहण्यास मदत होते.