पावसाळ्यात ब्लॅकहेड्सचा त्रास टाळणार्‍या '4' खास टीप्स

पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. 

Updated: Jul 8, 2018, 08:26 PM IST
पावसाळ्यात ब्लॅकहेड्सचा त्रास  टाळणार्‍या '4' खास टीप्स  title=

मुंबई : पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. ऊन पावसाचा खेळ सुरू झाल्याने त्वचेची थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. नाकाजवळील त्वचा तेलकट असल्याने तेथील भागाची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्सचा त्रास वाढतो. वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर यामधून अ‍ॅक्नेचा त्रासही वाढतो. पावसाळ्यात त्वचा विकार टाळण्यासाठी खास टीप्स
स्त्रियांसोबतच पुरूषांमध्येही ब्लॅकहेडचा त्रास जाणवतो. मग पुरूषांनो, पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष  देणं गरजेचे आहे, हे जाणून घेण्यासाठी खास टीप्स 

कशी घ्याल काळजी 

फेसवॉश - 

अनेकदा पुरूष फेसवॉश निवडताना काळजी घेत नाहीत. त्वचेनुसार फेसवॉश निवडताना काळजी घ्या. योग्य फेसवॉशची निवड केल्यास त्वचा मोकळी होण्यास मदत होते सोबतच इतर समस्या वाढण्याचा धोकाही कमी होतो. अ‍ॅक्नेचा त्रास टाळायचा असेल तर सेइसिलिक अ‍ॅसिडयुक्त फेसवॉश वापरा. यामुळे त्वचेच्या छिद्रातील मळ, घाण मोकळा होण्यास मदत होते. ... म्हणून पावसाळ्यातही त्वचेवर सनस्क्रीन लोशनची गरज !

अ‍ॅक्नेचा त्रास कमी होतो -  

पुरूषांना अ‍ॅक्नेचा त्रास असल्यास योग्य फेसवॉशचा वापर करणं आवश्यक आहे. हा त्रास ओव्हरनाईट कमी होणं शक्य नाही. अ‍ॅक्नेचा त्रास कमी करण्यासाठी योग्य फेसवॉशची तज्ञांच्या मदतीने निवड करा. 

मृत त्वचेचा थर 

चेहर्‍यावरील मृत त्वचेचा थर मोकळा करण्यासाठी प्रयत्न करा. यामुळे घाण,मळ साचून राहत नाही. परिणामी बॅक्टेरिया वाढत नाही. याकरिता तुम्ही स्क्रबचाही वापर करू शकता. 

स्वच्छतेची काळजी घ्या 

चेहर्‍याप्रमाणेच त्वचेवरील इतर ठिकाणी वाढणारा ब्लॅकहेड्सचा त्रासही आटोक्यात  ठेवा. त्यासाठी ब्लॅक हेड हटवणारे बॉडी वॉश वापरा.