Lip Care : थंडी जवळपास संपत आली आहे उन्हाळ्याला सुरवात झाली आहे थंडीच्या दिवसात ओठ फुटण्याची समस्या सर्वानाच होते. थंडीमध्ये ओठ फुटण्याची समस्या येते. दिवसात हवेत आद्रता असते हवा कोरडी राहते त्यामुळे त्वचेवर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. स्किनव्यतिरिक्त केसांवरसुद्धा याचा परिणाम दिसू लागतो अशा हवामानात त्वचा कोरडी म्हणजेच ड्राय होऊ लागते. हिवाळ्यात ओठ फुटु लागतात . ड्राय आणि फुटलेले ओठ फक्त खराब दिसत नाहीत तर ते तितकंच त्रासदायीसुद्धा असत .त्यामुळे जर तुम्हीही फाटलेल्या ओठांच्या समस्येने त्रस्त असाल तर एकदा हे घरगुती स्क्रब करूनच पहा. (Homemade lip care)
फुटलेल्या ओठांवर लीप बाम लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र लीप बाम मुळे तुमचे ओठ काहीच काळापुरते सॉफ्ट राहतात मात्र थोड्याच वेळात आधीसारखे फाटलेले ओठ दिसु लागतात .त्यामुळे या प्रॉब्लेम्ससाठी कायमचा आणि रामबाण उपाय करायला हवा. (homemade scrub for lips)
फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी, त्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी काही उपाय करू शकतो.ओठांची स्किन हि खूप पातळ आणि सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे कोणताही स्क्रब ओठांवर वापरण्याआधी खूप विचार करावा .शक्य असेल तर ओठांवरील डेड स्किन (how to remove dead skin from lips ) काढण्यासाठी नॅचरल पद्धतींचा अवलंब करावा .यासाठी होममेड स्क्रबचा वापर हा कधीही योग्यच यासाठी तुम्हाला हवीये फक्त साखर जी आपल्या घरात सहज उपलब्ध असते. (sugar homamde scrub for lips)
कसा बनवायचा होममेड स्क्रब
साखरेपासून स्क्रब बनवण्यासाठी, तुम्हाला मध आणि खोबरेल तेलासह ब्राउन शुगर ची गरज लागेल. या तिन्ही गोष्टी मिक्स करा. होममेड स्क्रब तयार...
कसे अप्लाय करावे
तयार झालेलं होममेड स्क्रब हे हलक्या हातानी ओठांवर सर्क्युलर मोशन ने चोळावे आणि मग पाण्याने स्वच करा. हा स्क्रब रोज वापरल्याने फाटलेल्या ओठांपासून आराम मिळेल.
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन (scrubbing lips will increse blood cerculation) सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल