मुंबई : तणावग्रस्त जीवनशैलीचा आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो. त्यापैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. उच्चरक्तदाबाच्या समस्येकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हृद्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी औषधोपचार फायदेशीर आहेत. मात्र औषधाच्या मार्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. मग ही औषध कमी करायची असतील तर त्यासोबत आहारात काही पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर आहे.
औषधांशिवाय तुम्हांला रक्तदाबावर नियंत्रण ठेवायचं असेल तर आहाराचं पथ्यपाणी सांभाळा. आहारामध्ये फळं, पालेभाज्या, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स, मीठाचा समावेश कमी करा. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी आहारात हवेत हे '5 पदार्थ
बोनलेस चिकन, मासे, रेड मीट, समुद्रातील मासे टाळणं हेच उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. आहारात ताजी फळ आणि भाज्यांचा समावेश वाढवणं अधिक फायदेशीर आहे.
नियमित चालणं किमान इतका व्यायाम केलात तरीही तुम्हांला अनेक आजारांचा धोक दूर ठेवायला मदत होईल. तुम्ही फिजिकली अॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास चालणं हा रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार महत्त्वाचा व्यायाम आहे. ही योगासने ठेवतात रक्तदाब नियंत्रणात
कंबरेचा वाढता घेर हा उच्च रक्तदाबाच्या रूग्णांसाठी फार त्रासदायक ठरतो. आहारात आणि व्यायामात बदल करून तुम्ही पोटाजवळील चरबी नक्कीच हटवू शकता.
उच्च रक्तदाबाचा त्रास वाढण्यामागे आहारातील सोडियमचे वाढते प्रमाण कारणीभूत ठरते. त्यामुळे खारावलेले पदार्थ, अळणी पदार्थांवर वरून मीठ टाकून खाणं टाळा. त्याऐवजी आहारात पोटॅशियमयुक्त पदार्थांचा समावेश वाढवा. केळं, भोपळ्याच्या बीया अधिक फायदेशीर आहेत.
मद्यपान हे आरोग्याला अत्यंत धोकादायक आहे. तुम्ही उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेतल्यानंतर किंवा आधी मद्यपान करत असलात तर त्यामुळे औषधाचा परिणाम कमी होऊ शकतो.
ताण तणावापासून पूर्णपणे दूर राहणं शक्य नाही. मात्र त्याच नियोजन करता येऊ शकतं. मानसिक धक्का बसेल किंवा तणाव अचानक वाढेल अशा परिस्थितींपासून शक्यतो दूर रहा. तुमच्या आवडत्या छंदामध्ये, योगाभ्यासामध्ये मन रमवा. यामुळे हळूहळू ताण हलका होण्यास मदत होते. एका मिनिटात तणाव कमी करण्यासाठी या ५ टीप्स ...