Neck Skin Tips : काळ्या पडलेल्या मानेवर 'हे' घरगुती उपाय करा, त्वचा होईल स्वच्छ व सुंदर!

Neck Skin Tips : चेहऱ्याच्या आणि मानेच्या त्वचेचा रंग वेगळा दिसला की, लाज वाटू लागते. उन्हाळ्यात घामाने मानेवरची घाण जमायला लागली की तिथली त्वचा काळी पडते. अशावेळी कोणते उपचार करावे ते जाणून घ्या... 

श्वेता चव्हाण | Updated: Jun 1, 2023, 04:59 PM IST
Neck Skin Tips : काळ्या पडलेल्या मानेवर 'हे' घरगुती उपाय करा, त्वचा होईल स्वच्छ व सुंदर!  title=
how to clean patchy neck home remedies

Neck Skin Tips in Marathi : कडक ऊन आणि जास्त प्रमाणात येणारा घाम तसेच शरीरातील हार्मोन असंतुलित झाल्यास मानेची त्वचा देखील काळे पडते. या समस्येवर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. कारण, सुंदर चेहरा असला तरी काळी पडलेली मान यांमुळे सौंदर्य निघून जाते. सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज होतो आणि मानेचा रंगही बदलतो. कधीकधी तर मानेवर काळसर डाग पडतात जे सहजासहजी जात नाहीत. तर ही समस्या कधीकधी हायपरपिग्मेंटेशनमुळे देखील होऊ शकते. हार्मोनल बदल देखील कारण असू शकतात. 

अशा परिस्थितीत हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. पण जर तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेतली नाही तर तुम्हाला पिगमेंटेशन होईल आणि त्यासंबंधी काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

बेसन आणि लिंबू

एक चमचा बेसन एक चमचा लिंबाचा रस आणि थोडे पाणी मिसळून पेस्ट बनवा. त्यानंतर मानेवर लावा आणि 10 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर हाताने हलका मसाज करून स्वच्छ करा. असे केल्याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार होईल.

लिंबू आणि गुलाब पाणी

लिंबाचा रस मानेवर लावल्याने मानेचा काळपटपणा कमी होतो. यासाठी एक लिंबू चांगले पिळून त्याचा रस काढा, त्यानंतर त्यात गुलाबजल टाका. आता मानेवर लावा आणि रात्रभर असेच राहू द्या आणि नंतर सकाळी पाण्याने धुवा.

कच्चे दुध

कच्च्या दुधामुळे त्वचा स्वच्छ होण्यास खूप मदत होते. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या आणि त्यात कापूस टाका आणि 20 मिनिटे ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

काकडी आणि गुलाब पाणी

प्रथम काकडी बारीक चिरून त्यात गुलाबजल टाकून पेस्ट बनवा. त्यानंतरच पेस्ट लावा आणि 10 मिनिटे राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

बटाट्याचा रस

बटाट्यामध्ये व्हिटॅमिन-सी आढळते जे सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करते. यासाठी प्रथम बटाटा किसून त्याचा रस काढा आणि मानेवर लावा ते 10 ते 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

कोरफेड वापरा

कॉर्फडमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि काही एन्झाईम्स असतात, जे त्वचेवरील पिगमेंटेशन कमी करण्याचे काम करतात. मानेवरवरील काळे डाग दूर करण्यासाठी सर्वप्रथम कोरफडीच्या पानाचा रस काढा आणि 10 मिनिटे मानेवर हलक्या हातांनी 10 मिनिटे मसाज करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)